पिस्टल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या इसमास शिताफीने केले जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. ३१/०८/२०२१ रोजी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गस्त करत असताना सपोनि नरेंद्र पाटील यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आंबेडकर वसाहत, औंध, पुणे याठिकाणी एका इसमाकडे पिस्टल असून तो पिस्टल कमरेला लावून फिरत आहे, अशी बातमी मिळाल्याने सदरबाबत चतुः श्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेश बोळकोटगी यांना माहिती दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने सपोनि नरेंद्र पाटील व पथक यांनी सापळा रचुन इसम नामे कुणाल संतोष लांडगे, वय २१ वर्षे, रा. आंबेडकर वसाहत, औघ, पुणे यास ताब्यात घेतले, त्याच्या कब्जातून ३१,०००/- रु कि.चे एक पिस्टल व दोन जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. त्याच्याविरुध्द चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्र. ७११/२०२४ आर्म अॅक्ट कलम ३(२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि नरेंद्र पाटील करत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परि-४, पुणे श्री हिंमत जाधव, मा. सहा पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री युवराज नांद्रे, सपोनि नरेंद्र पाटील, पोउनि प्रणिल चौगले, पो.अंम दुशिंग, भांगले, खरात, तरंगे, दुर्गे, वाघवले, तांदळे, मोमीन, विशाल शिर्के, श्रीधर शिर्के, दांगडे, माने यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

