दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 2 कडून कार चोरीच्या व फसवणुकीचे गुन्ह्यात आरोपी जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 2 पुणे शहर

महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :– दरोडा व वाहन चोरीविरोधी दोनचे पोलिस निरीक्षक श्री संदीपान पवार यांचे पथकातील पोलीस अंमलदार खरपुडे याना खबर मिळाली की, एक इसम काळ्या रंगाची किया कार नंबर नसलेली विक्री साठी फिरत आहे व संशयीत आहे. त्यावर सापळा रचून साडेसत्रनळी हडपसर या ठिकाणी सदर किया कार ही त्यामधील संशयीत इसम

शंकर रावसाहेब शिंदे वय ३३ वर्ष रा रावताळे कुरुडगाव ता शेवगांव जिल्हा अहमदनगर यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता सदर कार क्रमांक एमएच १६ डीजी ९५१८ किंमत अंदाजे १२०००००/- रू असा असून त्या बाबत शेवगाव पोलिस स्टेशन येथे कार चोरीचा गुन्हा दाखल असून अधिक चौकशी करून सदर आरोपीने शेवगाव तालुक्या मधील लोकांकडून शेअर ट्रेडिंग मधे १०% प्रति महिने परतावा मिळवून देतो आसे सांगून बऱ्याच लोकान कडून रुपये ०२ कोटी ८९ लाख ची फसवणूक केली असून त्याबाबत शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६२०/२०२४ कलम ४२०,४०६,४०९,३४ भा द वी दि २५/०७/२४ रोजी नोंद आहे .

आशा प्रकारे कार चोरी व फसवणूक असे दोन स्वतंत्र गुन्ह्यातील पाहिजे आरोपी यास चोरीच्या कार सह ताब्यात घेतले आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री.अमितेश कुमार, मा.सह पोलीस आयुक्त श्री.रंजन कुमार,मा.अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.शैलेश बलकवडे,मा.पोलीस उपायुक्त गुन्हे श्री.निखिल पिंगळे व मा.सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 श्री.इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 2 पोलीस निरीक्षक श्री संदीपान पवार यांचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी केली आहे


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!