गुन्हे शाखेची दमदार कामगिरी  ! खुनाच्या गुन्ह्यातील आंदेकर टोळीमधील आरोपीतांना  केले जेरबंद


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलिसन्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.०१/०९/२०२४ रोजी नानापेठ परिसरातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची गोळ्या घालून कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. त्यामध्ये सोमनाथ गायकवाड, गणेश कोमकर, सौ. संजिवनी जयंत कोमकर व इतर आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.
२) दिनांक ०५/०९/२०२५ रोजी सायं. १८/३० वा. च्या सुमा. यश पाटील व अमित पाटोळे हे अॅक्सेस गाडी व आमन पठाण व सुजय मेरगु हे स्प्लेंडर गाडीवरून गणेश कोमकर राहत असलेल्या बिल्डींगच्या समोर थांबले होते तेव्हा आमन पठाण व यश पाटील यांचे कमरेला लोड केलेले पिस्टल लावलेले होते. सायंकाळी १९.३० वा. च्या सुमारास गणेश कोमकर याचा मुलगा हा आयुष ऊर्फ गोविंदा हा त्याचा छोटा भाऊ याला क्लासवरुन घेवून बिल्डींगच्या पार्कीगमध्ये आला असताना, आमन पठाण व यश पाटील असे पार्कीग मध्ये गेले व त्यांनी गोविंदा ऊर्फ आयुष याचेवर त्यांचेकडील पिस्टलमधून फायर करुन खून केला व पसार झाले होते.
नमुदबाबत बंडु आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, तुषार वाडकर व इतर ७ लोकांविरूद्द समर्थ पोलीस ठाणे, पुणे गुन्हा रजि.नं.२०३/२०२५ बीएनएस १०३ (१),६१ (२), आर्म अॅक्ट ३ (२५), म.पो. अधि. कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गंभीर गुन्हा हा गणेशोत्सव २०२५ चे विसर्जन दिवसाच्या एक दिवस आधी घडल्याने मा. पोलीस आयुक्त मा.श्री. अमितेश कुमार सो, यांनी गुन्हे शाखेतील अधिकारी/अंमलदार व झोन वन विभाग यांना सुचना देऊन दाखल गुन्ह्यातील आरोपी तात्काळ ताब्यात घ्यावेत असे आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेकडील व. पोलीस निरिक्षक श्री कुमार घाडगे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश संख्ये, त्यांचेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी आरोपींचा शोध घेत असताना मिळालेल्या बातमीदाराचे माहीती वरुन गुन्हेशाखेने १) अमित प्रकाश पाटोळे, वय १९ वर्ष रा २१, नानापेठ, डोकेतालीमागे गणेशमंदिरा जवळ, पुणे २) यश सिध्देश्वर पाटील वय १९ चालु रा.व्दारा. संतोष बिडकर मच्छी मार्केट, नानापेठ, डोके तालीममागे, पुणे ३) अमन युसुफ पठाण उर्फ खान, वय २५ वर्ष, रा.१३ नानापेठ, समाज सुधारक मित्र मंडळा जवळ, डोके तालिम मागे, पुणे ४) सुजल राहुल मेरगु, वय १९ वर्ष, रा. रुम नं.६३, तीसरा मजला, दासरी वाडा, झारअळी, १०८५ भवानीपेठ, पुणे ५) सुर्यकांत उर्फ बंडु राणोजी आंदेकर ६) स्वराज निलंजय वाडेकर ७) तुषार निलंजय वाडेकर ८) वृंदावनी निलंजय वाडेकर यापैकी आरोपी अ.क्र.४) ते ८) यांना ताब्यात घेत असताना बुलढाणा पोलीसांची मदत घेतली.
वर नमुद आरोपीतांकडे कसुन तपास केला असता त्यांनी बंडु आंदेकर, कृष्णा आंदेकर, स्वराज आंदेकर, तुषार आंदेकर व वृदावनी वाडेकर यांनी कट रचुन व त्यांचे सांगणेवरून वनराज आंदेकर याचे खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांचे इतर साथीदार आमन पठाण, अमित पाटोळे, यश पाटील व सुजल मेरगु यांचेसह मिळून आयुष उर्फ गोविंदा गणेश कोमकर याची पिस्टलमधून गोळ्या घालून हत्या केल्याची कबुली दिली. त्यांना ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीसाठी समर्थ पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. नमुद आरोपीतांना मा. न्यायालयात हजर ठेवणेत आले असता. मा. न्यायालयाने आरोपीत क्र.३ ते ८ यांना दि.१५/०९/२०२५ रोजी पर्यंतची पोलीस कस्टडीची रिमांड मंजुर केली आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री. रंजन कुमार, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. राजेन्द्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कुमार घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश संख्ये, सपोनिरी दिपक बर्गे, सपोनि नितिन नाईक, पो. उपनिरीक्षक गौरव देव, पोउपनिरी राहुल मखरे, सहा. पो. फौज विनोद शिंदे, विठ्ठल साळुंखे, पोलीस अंमलदार शुभम देसाई, शशीकांत दरेकर, अनिकेत बाबर, अभिनव लडकत, हेमंत पेरणे, निलेश जाधव, मयूर भोसले, सिध्देश्वर वाघमारे, निलेश साबळे, उमेश मठपती, जगधने, अनिल कुसाळकर, प्रशांत शिंदे, पवन भोसले, विभुते, दिनेश म.पो. अंमलदार ज्योती मुल्का यांनी केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!