पोलीस बॉईज असोसिएशनच्या पुणे शहराध्यक्षपदी राहुल दादासाहेब जाधव
पत्रकार :- विशाल धाकतोडे (पुणे ग्रामीण)
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- शहर पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा वाघमारे यांच्या आदेशानुसार पुणे शहर हडपसर येथील दमदार व्यक्तिमत्व असणारे माननीय श्री राहुल दादासाहेब जाधव यांची पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करून नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
राहुल जाधव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन तसेच पुणे शहर पोलीस दलातील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीय व पोलीस पाल्यांचा अनेक समस्या सोडवण्यासाठी पोलीस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून 2019 पासून आंदोलन निवेदन मोर्चे केलेले असून पोलीस लाईन मधील अनेक समस्या सोडल्या आहेत व पोलिसांसाठी आजवर त्यांनी केलेले सामाजिक कार्य व जनसंपर्क दांडगा असल्यामुळे नियुक्ती करण्यात आली या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

