कुंजीरवाडी ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार नागरिक त्रस्त


पत्रकार :- प्रमोद बापू सावंत पुणे जिल्हा 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दिवाळी सणासुदीच्या काळात कुंजीरवाडी ग्रामपंचायत येथील वार्ड क्रमांक ६ येथे लावलेल्या पेविंग ब्लॉक काढून संपूर्ण रस्ता खोदकाम करून ठेवला आहे, त्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय होत आहे. रस्त्याच्या कामामुळे सगळीकडे धूळ आणि ठिकठिकाणी पाणी साठत असल्यामुळे गावात डेंग्यू ची साथ पसरत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

इलेक्शन जवळ येताच ग्रामपंचायत ने काम सुरू केले परंतु काम खूप संथ गतीने होत असल्यामुळे येथे टक्केवारीमुळे काम हळू होत असल्याचा प्रश्न नागरिकांना पडतो स्थानिक नागरिक हे सरपंच तसेच ग्रामसेवक यांच्यावर नाराज असल्याचे दिसून येते


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!