रेकॉर्डवरील अट्टल घरफोडी चोरास अटक, पुणे शहर भागातील 03 गुन्हे उघडकीस, गुन्हे शाखा युनिट 02 ची उल्लेखनीय कामगिरी
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट- २ पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- गुन्हे शाखा युनिट- 02 कार्यक्षेत्रात वाढत्या घरफोडीच्या अनुषंगाने युनिट -02 प्रभारी अधिकारी श्री. नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप- निरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, अमोल सरडे गजानन सोनुने, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख अशी टीम तयार करून उघडकीस न आलेले घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत महत्त्वाचे सूचना दिल्या होत्या. युनिट-02 कडील पोलीस अंमलदार गजानन सोनुने व अमोल सरडे यांचे गुप्त बातमी वरून आरोपी विकास सुनील घोडके, वय 28, वर्ष सध्या रा. दयासागर सोसायटी, गणेश नगर वडगाव शेरी, पुणे व मुळगाव – मिरी रोड, विद्यानगर, शेवगाव, जिल्हा – अहमदनगर यास ताब्यात घेऊन त्याचेकडे कसून चौकशी केली असता,
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.क्र. 699/2023 भादवी 454 380 प्रमाणे गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास अटक करून पोलीस कस्टडी दरम्यान दाखल गुन्ह्यातील 14 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 100 ग्राम वजनाचे चांदीचे दागिने, गुन्हे करण्यासाठी वापरलेले लोखंडी कटावणी, चावीचा जुडगा तसेच इतर गुन्ह्यातील 77.260 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने असा सर्व मिळून 5,54,760/- रु किमतीचा माल हस्तगत करून,
1) सिंहगड पोस्टे गु.र.क्र. 60/2022 भादवी 454 380
2) फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.क्र.र 31/2024 भादवि 380,454
असे एकूण 03 गुन्हे उघडकीस आणले* आहेत.
आरोपी विकास घोडके हा रेकॉर्ड वरील अट्टल घरफोडी चोर असून त्यावर ठाणे, कल्याण, पिंपरी-चिंचवड, लातूर तसेच पुणे शहर भागामध्ये 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आरोपीने सोन्या- चांदीचे दागिने 1) प्रतीक सुरेश दहिवाळकर, वय 22 वर्ष, धंदा – सोनार कारागिरी, रा. मारवाडी गल्ली, शेवगाव, जिल्हा अहमदनगर. 2) रोहन उर्फ दुध्या चव्हाण रा. आईना हॉटेल जवळ, नाना पेठ, पुणे यांना विक्री केल्याचे सांगितल्याने त्यांना गुन्ह्यात भादवी कलम 411 प्रमाणे कलम वाढ करून ते मिळून न आल्याने त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री.अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री. प्रवीण पवार , अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहा.पो.आयुक्त गुन्हे श्री.सुनील तांबे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार बिडवई, गुन्हे शाखा, युनिट – 2, पुणे शहर पोलीस उप-निरीक्षक श्री नितीन कांबळे,पोलीस अंमलदार अमोल सरडे,गजानन सोनुने, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख, उज्वल मोकाशी, साधना ताम्हणे, शंकर नेवसे संजय जाधव, गणेश थोरात,निखिल जाधव, विनोद चव्हाण यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

