पिस्टल मधुन फायरींग करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-या दोन आरोपीच्या सिंहगडरोड पोलीसांनी आवळल्या मुसक्या


पंकेश जाधव संपादक 7020794626

सिंहगडरोड पोलिस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, सिंहगडरोड पोलीस स्टेशन हाद्दीत दिनांक १८/०४/२०२४ रोजी ०१.१५ वा. सुमारास चैतन्य परमीट रुम, वडगाव बुद्रुक, नवले पुलाजवळ, पुणे या ठिकाणी फिर्यादी व अनोळखी आरोपी यांची माचीस मागण्याच्या कारणावरुन शिवीगाळ व बाचाबाची झाली होती. त्यानंतर आरोपीत हे मोटार सायकल वरुन निघुन जात असताना, फिर्यादी हे त्याचे पाठीमागुन मोटार सायकल वरुन गेले रात्रौ ०२.०० वा. चे सुमारास भुमकर चौक, राजधानी स्वीट होमजवळ, नन्हे पुणे या ठिकाणी फिर्यादी व त्यांचा मित्र यांचेवर आरोपींनी त्यांचेजवळील पिस्टल मधुन गोळीबार करुन त्यांना जखमी केले होते. त्याअनुशंगाने सिंहगडरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं.२३९/२०२४ भादवि कलम ३०७,३२४,३२३, ५०४,५०६,३४ आर्म अॅक्ट कलम ३(२५) (२७), मपोअधि, कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे.

Advertisement

सदर गुन्हयाचे अनुशगाने मा. वरिष्ठांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सपोनि सचिन निकम व त्यांचा स्टाफ असे यांनी कैाशल्याने व गोपनिय बातमीदारा मार्फत आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन, त्यांना त्याचे नाव पत्ता विचारता त्यांची नावे १) ब्रम्हदेव निवृत्ती कांबळे वय ३१ वर्षे रा.सध्या फ्लॅट न. ४ मजला, औदुंबर सोसायटी जवळ, श्री. कंट्रोल चौक न-हे पुणे. मुळपत्ता मु.पो.शिरसल ता. औसा जि. लातुर २) गोपाळ पांडुरंग सुरवसे वय-३० वर्षे रा. सध्या फ्लॅट न. ४ मजला, औदुंबर सोसायटी जवळ, श्री. कंट्रोल चौक न-हे पुणे. मुळपत्ता मु.पो. शिरसल ता. औसा जि. लातुर असे असल्याचे सांगितले, त्याचेकडे चौकशी केली असता, आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपींनी गुन्हा करताना वापरलेले गावठी पिस्टल जप्त करण्यात आले आहे. त्यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन पुढील दाखल गुन्हयाचा अधिक तपास श्री. राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिंहगड रोड पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर श्री प्रविणकुमार पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री संभाजी कदम सोा, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -३. पुणे शहर श्री. भिमराव टेळे सोो, सहा पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, अतिरिक्त कार्यभार सिंहगड रोड विभाग, पुणे शहर श्री. विजय कुंभार साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक श्री संतोष भांडवलकर पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, राजु वेगरे, शिवाजी क्षिरसागर, देवा चव्हाण, विकास पांडुळे, राहुल ओलेकर, सागर शेडगे, विकास बांदल, स्वप्नील मगर, अमोल पाटील, यांचे पथकाने केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!