काळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी. आरोपींकडून एकुण ०२ गावठी पिस्टल, ०४ जिवंत काडतूसे व ०१ मोबाईल जप्त
पंकेश जाधव संपादक 7020794626
काळेपडळ पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणून २०२४ च्या अनुषंगाने चालू असलेल्या आदर्श आचासंहिताच्या अनुषंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे श्री. मानसिंग पाटील यांचे आदेशांन्वये काळेपडळ पोलीस ठाणेचे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, पोलीस हवालदार ७७३९ दाऊद सय्यद, पोलीस हवालदार ७८३५ अमोल काटकर, पोलीस अंमलदार ८२१३ श्रीकृष्ण खोकले, पोलीस अंमलदार सद्दाम तांबोळी, पोलीस अंमलदार २४३३ महादेव शिंदे, पोलीस अंमलदार ८६४८ अतुल पंधरकर असे पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पो. हवा. ७७३९ दाऊद सय्यद व पो.अं.८६४८ अतुल पंधरकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काळेपडळ पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामेः-रितेश बाबासाहेब कसबे, रा. साठेनगर, तरवडेवस्ती, महंदवाडी रोड, हडपसर, पुणे हा त्याचा मित्र राहुल संजय चौधरी याच्या सोबत देसाई हॉस्पीटचे पाठिमागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ या ठिकाणी दोघे दखलपात्र गुन्हा करणेचे उद्येशाने आपले कब्जात काहीतरी संशयित चीजवस्तु आपले जवळ बाळगुन वावरत असुन संशयित चीजवस्तु हि अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता आहे.
असे बातमी मिळताच, सदर ठिकाणी सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे यानी सदरबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. मानसिंग पाटील यांना कळविले असता त्यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरी. अमित शेटे व वरील पोलीस स्टाफ असे देसाई हॉस्पीटलच्या मागे, पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या कच्च्या रोडच्या कडेला सर्व टिमला दिलेल्यां सुचनांप्रमाणे जावून सर्वांनी मिळालेल्या माहितीची खात्री केली असतां, रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे रितेश बाबासाहेब कसबे, रा.साठेनगर, तरवडेवस्ती, महंदवाडी रोड, हडपसर, पुणे हा त्याचा सोबतचा असणारा मित्र हे पोलीसांना पाहून संशयितरित्या व कावरे बावरे स्थितीत आढळुन आलेने सर्व टीमने चोहोबाजूने त्यास घेराव घालून ताब्यांत घेतले. त्यावेळी त्यांची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता इसम नामे रितेश बाबासाहेब कसबे याच्या याच्याकडे कमरेच्या उजव्या बाजूस एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल मिळुन आलेल्या अग्निशस्त्राची मॅगझीन काढून पाहता त्या मॅगझिन मध्ये दोन जिवंत काडतुस मिळुन आले असता ती जिवंत काडतुसे मॅगझीन मधुन काढुन वेगळी मॅगझीन परत नमुद पिस्टलमध्ये लावुन त्यास ताब्यात घेतली प राहुल संजय चौधरी याच्या कमरेस डाव्या बाजुस एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल व पॅन्टचे डाव्या खिशात एक मोबाईल फोन व उजव्या खिशात दोन जिवंत काडतूस मिळुन आले. तसेच राहुल संजय चौधरी याच्याकडे मिळुन आलेल्या अग्निशस्त्राची मॅगझीन काढून पाहता सदरची मॅगझीन ही खाली मिळून आली असता सदरची मॅगझीन ही पुन्हा पिस्टलमध्ये लावून सदरची पिस्टल ही ताब्यात घेण्यात आली आहे.
त्यांचे ताब्यात मिळुन आलेले अग्निशस्त्र व जिवंत काडतुसांबाबत त्याचेकडे कोणता अधिकृत परवाना आहे का याचेबाबत विचारणा करता त्याचेकडे तसा कोणताही परवाना नसल्याचे सांगुन त्याने साठेनगर, तरवडेवस्ती परीसरात दहशत करणेकामी सदरचे पिस्टल हे आपण जवळ बाळगल्याची कबुली दिली. तरी नमूद इसमांकडून दोन लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल, चार जिवंत काडतुस सोबत एक मोबाईल फोन हे दहशत करणेचे उद्देशाने विनापरवाना, बेकायदेशिर व अनधिकृतरित्या आपले कब्जात बाळगले असताना मिळून आलेने नमूद इसमांविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व मुंबई पोलीस कायदा कलम-३७ (१) (३) सह १३५ अन्वये काळेपडळ (वानवडी) पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे ताब्यातून दोन लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल, चार जिवंत काडतुस सोबत एक मोबाईल फोन असा एकुण ९०,८००/- रुपये किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यातील दोन्ही आरोपीत इसमांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सो पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. आर राजा, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त साो. धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, यांचे मागदर्शनाखाली मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, पोलीस पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस हवालदार ३९७७ दाऊद सय्यद, पोलीस हवालदार ७८३५ अमोल काटकर, पोलीस हवालदार ७३१८ परशुराम पिसे, पोलीस अंमलदार ८२१३ श्रीकृष्ण खोकले, पोलीस अंमलदार १००७० सद्दाम तांबोळी, पोलीस अंमलदार २४३३ महादेव शिंदे, पोलीस अंमलदार ८६४८ अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार ८३०२ सुर्यवंशी यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

