पुण्यात अज्ञात आरोपीने महिलेच्या चेहऱ्यावर धारधार वस्तूने वार करून केली निर्घृण हत्या.


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज  ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेच्या चेहऱ्यावर धारधार वस्तूने वार करत तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटनेने बिबवेवाडी परिसर हादरला आहे. ही घटना बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकात गोयल गार्डनसमोर घडली. हत्या करण्यात आलेल्या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असून याबाबत पोलिस हवालदार गजानन खंडाळे यांनी बिबवेवाडी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.

गंगाधाम चौक परिसरात गोयल गार्डनजवळ जय संतोषी माँ आयुर्वेदिक कॅम्प नावाने कापडी तंबू आहे. शनिवारी सकाळी या तंबूत एक महिला मृतावस्थेत आढळली याबाबत नागरिकांनी माहिती बिबवेवाडी पोलिसांना दिली. हत्येची माहिती प्राप्त होताच पोलिसांचा तापा घटनास्थळी दाखल झाला.

Advertisement

यावेळी प्राथमिक तपासणीत या महिलेच्या चेहऱ्यावर धारधार वस्तूने वार करण्यात आल्याचे दिसून आले. हत्या करण्यात आलेल्या महिलेचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे जवळपास आहे. ही महिला आयुर्वेदिक औषधी विक्रीचा व्यवसाय करीत होती. अज्ञात व्यक्तीने तिच्या चेहऱ्यावर धारधार वस्तूने मारून तिला गंभीर जखमी केले होते.

पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी ससून रूग्णालयात पाठविला आहे. ही हत्या कोणत्या कारणातून झाली या मागचे कारण स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण काळुखे करत आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!