“पुणे रेल्वे स्टेशन, पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशन व मुंबई येथे बॉम्ब फोडणार असल्याचा नियंत्रण कक्षास खोटा कॉल करणाऱ्या इसमास हडपसर तपासपथकाने घेतले ताब्यात “


आकाश पांचाळ सह संपादक 

हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :-दिनांक १६.०२.२०२४ रोजी एका अज्ञात इसमाने पुणे शहर नियंत्रणकक्षास कॉल करून कळवीले की, दिनांक १६/०२/२०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वा. चे सुमारास शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड, पुणे रेल्वे स्टेशन, मुंबईला बांद्रा आणि गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी बॉम्ब फोडण्यात येणार आहे.

प्राप्त झालेल्या कॉलचे गांभिर्य व दिनांक १६/०२/२०२४ हडपसर पोलीस ठाणे हद्दीत असलेली व्हीव्हीआयपी मुव्हमेंट यामुळे श्री. संतोष पांढरे साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांना नमुद इसमाचा शोध घेवून पुढील कार्यवाही करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तपासपथक अधिकारी सपोनिरी अर्जुन कुदळे, पोलीस अंमलदार संदीप राठोड, अतुल पंधरकर, अनिरूध्द सोनवणे, अमित साखरे यांचे पथकाने तांत्रिक तपास करून कॉलर इसम नामे प्रविण पंडित येशी वय ३५ वर्ष, धंदा- इलेक्ट्रिशीयन, राहणार गंगोत्री कॉमप्लेक्स ३ रा मजला, फ्लॅट नंबर-१०, स्वाद बिर्याणी जवळ, महादेवनगर, मांजरी रोड, हडपसर पुणे हा मिळून आला. त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षास केलेले कॉलबाबत विचारणा केली असता, त्याने दारु पिवून, दारुचे नशेच सदर कॉल केलेला असल्याचे व सदरील प्राप्त कॉलप्रमाणे कोणताही प्रकार नसल्याचे त्याने प्राथमिक चौकशीत सांगितले.

Advertisement

सदर प्रकरणाचे अनुषंगाने बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गु.र.नं ५१/२०२४ भादंवि कलम- १८२(ब), ५०६ (२), ५०५ (ब), ५०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याने ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत आरोपीस पुढील कार्यवाही साठी बंडगार्डन पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस स्टेशनचे पो.उप. निरी लोहार हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही श्री अमितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त साो पुणे शहर श्री. मनोज पाटील सां, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग व मा. आर राजा सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. संतोष पांढरे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. पंडीत रेजितबाड साो, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, अतुल पंधरकर, अनिरूध्द सोनवणे, अमित साखरे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्ड, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!