वारजे माळवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! दृश्यम ३ फिल्मीस्टाईलने केलेल्या खुनाचा केला उलगडा


आसमा सय्यद पुणे प्रतिनिधी
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाvपोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २८/१०/२०२५ रोजी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी यांनी मिसींगची तक्रार दिली होती. दाखल मिसींगच्या अनुषंगाने फिर्यादी यांना चौकशीकामी बोलावले असता त्याने त्याची पत्नी ही श्रीराम मिसळ हाऊस, गोगलवाडी फाटा, मुंबई बेंगलोर हायवे, शिंदेवाडी पुणे येथून मिसींग झाल्याबाबत सांगीतले. त्यामुळे सदरची मिसींग ही राजगड पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आली होती. सदर चौकशीदरम्यान त्याने सांगितलेल्या हकीकतीमध्ये संशयास्पद हालचाली वाटत असल्याने वपोनि विश्वजीत काईगडे यांनी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे व पोलीस उप-निरीक्षक नितीन गायकवाड यांना सदर मिसींग जरी राजगड पोलीस स्टेशन कडे वर्ग झाली असली तरी चौकशी पुढे चालु ठेवण्याचे सागितले असता वाखल मिसींगचा तपास योग्य प्रकारे करण्यासाठी मा. पोलीस उपायुक्त सभाजी कदम यांनी आदेशित केले.
दाखल मिसींगच्या अनुषंगाने तपास पथकाने सदरची मिसींग दाखल झाल्यानंतर मिसींग महीलेचा तक्रारदार पती नामे. समीर पंजाबराव जाधव, वय ४२ वर्षे, रा. फ्लटें नं. ३०४. श्री. स्वामी संकुल अपार्टमेंट, तलाठी ऑफीस शेजारी, शिवणे पुणे. यास चौकशीकामी बोलावले असता त्याचेकडे सदर मिसींगबाबत अधिक तपास केला असता त्याने त्याच्या पत्नीवर असल्याचे संशयाचे कारणावरून खुन केला असल्याचे कबुल केले. सदरबाबत याचे विरुध्द वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ००/२०२५ भा.न्या.सं.क १०३ अन्वये गुन्हा दाखल करुन राजगड पोलीस स्टेशन वर्ग येथे करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३, पुणे शहर, श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर, श्री. भाऊसाहेब पठारे, यांचे मार्गदर्शनाखाली वारजे पोलीस स्टेशन कडील मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विश्वजीत काईगडे, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. प्रकाश धेंडे, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. निलेश बडाख यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस उप-निरीक्षक नितीन गायकवाड, पोलीस अंमलदार गणेश कर्चे, सुनिल मुठे, योगेश वाघ, शरद पोळ व शिरीष गावडे यांनी केली.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!