सराईत मोटार सायकल चोरट्यास अटक करुन त्याच्याकडुन चोरीच्या एकुण २५ मोटार सायकली केल्या जप्त
पंकेश जाधव संपादक 7020794626
विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस स्टेशन श्रीमती दिपाली भुजबळ, यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक बरुरे व अंमलदार यांना सुचना व मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे अधिकारी व अंमलदार यांनी मोटार सायकल चोरी झालेल्या घटनास्थळावर भेट देवून सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व कॉल डिटेल तपासले असता रेकॉर्ड वरील सराईत मोटार सायकल चोर संतोष शिवराम घारे रा. मु.पो. ओझरडे ता. मावळ जि. पुणे हा मोटार सायकल चोरी करीत असल्याचे उघड झाले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे श्रीमती दिपाली भुजबळ, यांनी पोलीस अधिकारी व पोलीस अंलदार यांचे पथक तयार करुन आरोपी संतोष शिवराम घारे याचा शोध सुरु केला. पथकातील पोलीस अमालदर मयुर भोसले व आशिष खरात यांनी आरोपी संतोष घारे याचा आळंदी, पुणे स्टेशन, देहु, चाकण, पिंपरी येथे सीसीटीव्ही फुटेज वरुन आरोपीचा मागमुस काढल सतत ०७ दिवस कसोशीने शोध घेवुन त्यास अतिशय शिताफीने पुणे स्टेशन येथे ताब्यात घेतले. त्याच्याकडे विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा क्रमांक ३१/२०२४ कलम ३७९ भा.दं. वि. प्रमाणे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने नमूद गुन्हयातील तसेच यापुर्वी वेळोवेळी विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतुन चोरी केलेल्या एकुण २५ मोटार सायकल काढुन दिलेल्या आहेत. आरोपी नामे संतोष शिवराम घारे वय ४२ वर्षे रा. मुपो. ओझरडे, ता. मावळ जि. पुणे यास अटक केलेली असुन त्याच्याकडुन एकुण २५ मोटार सायकल जप्त केल्या आहेत.
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त श्री. प्रवीणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१ श्री. संदिप सिंह गिल्ल, मा. सहा. पोलीस आयुक्त, श्री. वसंत कुवर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती दिपाली भुजबळ तसेच पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे, पोलीस अंमलदार राकेश गुजर, रेवण कंचे, अशोक माने, मयुर भोसले, गणेश काठे, हेमंत पालांडे, महावीर वलटे, आशिष खरात, अर्जुन थोरात, साताप्पा पाटील, नितीन बाबर, राहुल मोरे, संतोष शेरखाने, अर्जुन कुडाळकर यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

