वानवडी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कारवाई ! वानवडी परिसरात खुनाचा प्रयत्न करणारे आरोपी जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक २२/०३/२०२४ रोजी रात्री ०९/४५ वा. चे सुमारास हेवन पार्क येथील जंगलात फिर्यादी यांचे सोबत झालेल्या जून्या झालेल्या भांडण मिटवण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांना बोलावून घेवून फिर्यादी यांना धारधार शस्त्र, लोखंडी रॉड, काचेची चाटली यांनी ८ ते १० आरोपीनी मारहाण करण्यात आलेली होती. त्याचायत वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २२९/२०२४ भा. द. वि. कलम ३०७, ५०६(२), ३२४, ३२३, १४३, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
दाखल गुन्हयाचे अनुषंगाने वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे यांनी तपास पथक प्रभारी पोउनि संतोष सोनवणे व स्टाफ यांना गुन्हयाचे अनुषंगाने मार्गदर्शन करुन सीसीटिव्ही चेकींग, तसेच फिर्यादीकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीचे आधारे आरोपींताचा शोध घेवून अटक करणेकामी पथके तयार फेली होती. तपासा दरम्यान दाखल गुन्हयातील आरोपी बाबत बातमीदारांकडून माहिती काढून शोध घेवून २४ नासाचे आत गंभीर गुन्हयातील आरोपीत यांना जेरबंद करून अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपीचे नाव खालील प्रमाणे –
१) यश राजन स्वाभी, यय १९ वर्षे रा.स.नं. ५६/५७ आझादनगर झेनसर कॅम्पुटर अॅकॅडमी जवळ, वानवडी पुणे
२) माधय मुरलीधर पुले, वय १९ वर्षे, रा. स.नं. लक्ष्मीपार्क, वाडकर मळा, महमंदवाडी, हडपसर पुणे
३) शिवम परशुराम जगताप, वथ १९ वर्षे रा. एस.आर.पी.एफ ग्रुप नंबर ०२, २४२ क्वॉर्टरर्स, वानवडी पुणे
४) यश भारत सहेरीया, वय १९ वर्षे रा. लेन नंबर ०१, आझादनगर, वानवडी पुणे
५) शंतनू तुकाराम शिंदे, वय २० वर्षे रा. स. नं. ५७, आझादनगर वानवडी पुणे
६) सँग सलोमन मिरपगार, वय २२ वर्षे रा. गल्ली नंबर १०, स. नं. ५७. वानवडी, पुणे
७) अशिष विशाल चव्हाण, वय १९ वर्षे रा. स. नं. ५७. आझादनगर, वानवडी, पुणे
८) स्वराज तुकाराम शिंदे, वय १९ वर्षे रा. श्रेयस अपार्टमेन्ट समोर, आझादनगर वानवडी पुणे
तसेच २ विधीसंघर्षीत बालक
वर नमूद अटक आरोपीत याचेकडे अधिक तपास करता आरोपींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री प्रविण पवार, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परि.-५, पुणे शहर श्री आर राजा, व मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पतंगे, पोलीस निरिक्षक गुन्हे राजेद्र करणकोट व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, हरिदास कदम, अमजद पठाण, विनोद मंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, यतिन भोसले, अमोल गायकवाड, गोपाल मदने यांनी केली आहे.
सदर गुन्हयाचा तपास सहा पोलीस निरीक्षक, दत्तप्रसाद शेंडगे, वानवडी पोस्टे पुणे, हे करत आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

