सराईत विधीसंघर्षीत बालकाकडुन अवैध गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राऊंड केले हस्तगत


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर.
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.१०/११/२०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफ हे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे व अभिनय चौधरी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने नवले पुलाकडुन कात्रज कडे जाणाऱ्या शहीद कर्नल पेट्रोल पंपाच्या समोरील सर्व्हस रोडवर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेवुन थांबला आहे अशी बातमी मिळाली असता तात्काळ सदर पोलीस तपास पथक हे नवले पुलाकडुन कात्रज कडे जाणाऱ्या शहीद कर्नल पेट्रोल पंपाच्या समोरील सहीस रोडवर गेले असता तेथे एक विधीसंधर्षीत बालक हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रु. किं. चे एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतुस असा एकुण ५०,५००/- रु.चे मुद्देमालासह मिळुन आल्याने त्याचेकडुन सदरचा मुद्देमाल हस्तगत करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ४५८/२०२५, भा.ह. अधि.क. ३. २५, म.पो. अधि.क. ३७ (१) (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २. पुणे शहर, श्री. मिलींद मोहीते, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर, श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार व संदीप आगळे या पथकाने केली.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!