अफिम विक्री करणा-या इसमांस केले जेरबंद


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक 1 पुणे शहर 
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १०/१०/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना लोहगाव वाघोली रोड, पुणे येथील शिवकरवस्ती, लोहगाव वाघोली रोड, शिवरकर कॉम्लेक्स, शॉप नं.२० समोरील मोकळया जागेत लोहगाव वाघोली रोड पुणे येथे एक इसम हा काळ्या रंगाची सँग खांदयास अडकवून कोणाचीतरी वाट पाहत संशयितरित्या उभा असल्याचे दिसले. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलीस अधिकारी व अंमलदार त्याचे बाजुने जात असताना त्याने पळुन जाण्याचा पर्यंत करीत असताना त्यास जागीच पकडुन त्यास पळुन जाण्याचे कारण विचारता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने सदर इसमाची व त्याच्या ताब्यातील काळया रंगाच्या सॅगची झडती घेतली. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव तुलसिदास किसनदास वैष्णव वय ३० वर्षे, रा. पोस्ट वरणी, तहसिल वल्लभनगर, जि, उदयपुर, राज्य राजस्थान असे सांगितले. त्याचे ताब्यात २२.३९,२००/- रु कि.चा ऐवज मिळुन आला. असुन त्यामध्ये २२,२४,०००/-रु.चा, १ किलो ११२ ग्रॅम आफिम हा अंमली पदार्थ, १५,०००/- रु.कि. दोन मोबाईल फोन, २००/-रु.कि. एक काळया रंगाची सँग असा ऐवज मिळुन आला. सदर आरोपी विरुध्द वाघोली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ५६९/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), १७ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बाबत पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक हवाले, वाघोली पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
वरील नमुद कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री.निखील पिंगळे, मा. सहाय्यक पालीस आयुक्त, गुन्हे १ श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत अन्नछत्रे, सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार सचिन माळवे, विशाल दळवी, मारुती पारधी, नागनाथ राख, संदिप शिर्के, दयानंद तेलंगे, विपुन गायकवाड, संदेश काकडे व दत्ताराम जाधव यांनी केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!