अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या गुन्हेगारास वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
जोसेफ नडेसन पुणे प्रतिनिधी
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दिनांक १७/०९/२०१९ रोजी १०/०० वा.चे. सुमारास आरोपी अनिस नैस मोहम्मद, वय ३६ वर्षे रा. स.न. ६३ यथील अडंर कन्स्ट्रक्शन रुम, कृष्णानगरजवळ, मोहमंदवाडी, पुणे याने पिडीत अल्पवयीन निर्भया ही खेळत असताना तिला चॉकलेट देण्याचे सांगून त्याचे रुममध्ये घेऊन जाऊन ती अल्पनवयीन असल्याची जाणीव असताना तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला आहे. म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.७६७/२०१९ भा.दं. वि. कलम ३७६.३७६ (३),३७६ (एबी) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ४,६,८,१०,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक स्वराज पाटील, सध्या नमेणूक विशेष शाखा, पुणे शहर यांनी केला व यातील आरोपीविरुद्ध मा. न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले.
वरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्या अती मा.अतिरीक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश (बा.लैं.अ.सं.का.) शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपी अनिल नैस मोहम्मद यास दिनांक १०/१०/२०२५ रोजी २० वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

