पुणे विमानतळावर बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून 5 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त;
पुणे विमानतळावर बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून 5 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्तबँकॉक ते पुणे अंमली पदार्थ तस्करीचा नवा राजमार्ग
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
महा पोलीस न्यूज !ऑनलाईन पुणे : बँकॉकहून लोहगाव विमानतळावर आलेल्या भारतीय प्रवाशाकडून सीमा शुल्क विभागाने साडेदहा कोटी रुपयांचे हायड्रोपानिक गांजा जप्त केला आहे. या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
अभिनय अमरनाथ यादव असे या प्रवाशाचे नाव आहे. यादव हा मुळचा उत्तर भारतातील असून तो बँकॉकहून २४ जुलै रोजी थेट पुण्यात आला. इंडिगो विमानातून आलेल्या प्रवाशाचा हालचाली सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी त्याला अडवून चौकशी केली. तेव्हा त्याच्या सामानामध्ये १०.४७ किलोग्रॅम हायड्रोपोनिक वीड (मारिजुआना) आढळून आला, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात साडेदहा कोटी रुपये इतकी किंमत आहे. सीमा शुल्क विभागाने त्याला अटक करुन न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
Advertisement
हायड्रोपोनिक गांजा हा अत्यंत महागडा समजला जातो. तो शीतगृहात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नियंत्रित वातावरणात वाढविण्यात येतो. बँकॉक ते पुणे हा आता अंमली पदार्थांच्या तस्करीचा एका नवा मार्ग झाल्याचे उघड होत आहे. गेल्या काही दिवसात सीमा शुल्क विभागाने हायड्रोपोनिक गांजा पकडण्याची ही तिसरी वेळ आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

