येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे महिला बंदी जनांमध्ये स्वस्थ, निरोगी, शांततापूर्ण जिवन जगण्यासाठी योगा घेण्यातआला
पंकेश जाधव संपादक 7020794626
येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे-०६.
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- जागतिक योग दिन दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. योग हा व्यायामाचा एक प्रभावशाली प्रकार आहे, ज्याच्या माध्यमातुन केवळ शरीराच्या विविध अवयांमधीलच नाही तर मनाचेही संतुलन राखले जाते. कारागृहाच्या आत चारभितीमध्ये महिला बंदी जनांमध्ये स्वस्थ, निरोगी, शांततापूर्ण जिवन जगण्यासाठी योग अभ्यासाचे महत्व अनन्यसाधारण आहे. तसेच आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये मनःशांती टिकवून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग.त्यानुसार दि.२१.०६.२०२४ रोजी महिला कारागृहामध्ये महिला वंद्यांसाठी कैवल्यधाम, स्वामी केवल्यानंद मार्ग लोणवळा, पुणे या संस्थेमार्फत महिला वंद्यांसाठी योग दिनानिमित्त योग शिविर आयोजित करण्यात आले. सदर योग कार्यक्रमात ७० महिला बंद्यांनी सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रमामध्ये योग शिक्षिका श्रीमती. वर्षा कुंभार यांनी महिला वंद्यांना मार्गदर्शन केले.
सदर उपक्रम मा. श्री. अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतून व मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
सदर उपक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी श्रीमती. पी. पी. कदम उपअधीक्षक, श्रीमती. आर ए खिलारी, महिला तुरुंगाधिकारी, श्रीमती. पी जे पालोदकर, महिला तुरुंगाधिकारी योग शिक्षिका श्रीमती. वर्षा कुंभार व इतर महिला कर्मचारी यांनी कामकाज पाहीले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

