दरोडा विरोधी पथक, पिपरी चिंचवड यांची अग्नीशस्त्र कार्यवाहीमध्ये पुन्हा उल्लेखनीय कामगिरी ! ०३ आरोपींना अटक करुन अग्नीशस्त्रे खरेदी विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्थ करुन ०७ गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे (राऊंण्ड) जप्त
पंकेश जाधव संपादक 7020794626
दरोडा विरोधी पथक, पिपरी चिंचवड शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- लोकसभा निवडणुक २०२४ अनुशंगाने मा. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये बेकायदा अग्नीशस्त्राची तस्करी करणारे तसेच जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांबाबत माहिती प्राप्त करुन कार्यवाही करणेबाबत आदेश दिले होते. त्याअनुशंगाने दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिं चिं. कडील अधिकारी व अंमलदार हे गोपनिय बातमी प्राप्त करीत असताना पोलीस शिपाई २६४३ गणेश सावंत, पोलीस शिपाई २६७३ सुमित देवकर व पोलीस शिपाई २९४७ विनोद वीर यांना दिनांक २८/०४/२०२४ रोजी २१.४५ वा चे सुमारास मरकळ गाव पुणे येथे सराईत गुन्हेगार नामे अर्जुन भाऊराव सुर्यवंशी वय २० वर्षे रा. कोकण धर्मशाळा पदमावती रोड आळंदी पुणे हा गावठी पिस्टल हे घेवुन येणार असल्याची बातमी प्राप्त झाली असता, दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी पथकातील पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी, पोलीस शिपाई २६४३ गणेश सावंत, पोलीस शिपाई २६७३ सुमित देवकर, पोलीस शिपाई २९४७ विनोद वीर व पोलीस हवालदार १६७४ सागर शेडगे यांना मिळालेल्या बातमीची खातरजमा करुन कार्यवाही करणेबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे सदर ठिकाणी सापळा रचुन नमुद सराईत गुन्हेगार अर्जुन सुर्यवंशी यास मरकळ गाव पुणे येथे पकडण्यात आले. त्यावेळी त्याचेकडुन ८२,००० रुपये किंमतीचे ०२ गावठी पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे (राऊंण्ड) हे जप्त करण्यात आले होते. त्याअनुशंगाने आळंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर १२८/२०२४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व पुढील तपास दरोडा विरोधी पथकाकडुन सुरु करण्यात आला.
नमुद गुन्हयाचे तपासादरम्यान सदर गुन्हयातील अटक आरोपी अर्जुन सुर्यवशी याने पिंपरी चिंचवड शहरामध्ये अग्नीशस्त्राची तस्करी करणारा (वेपन डिलर) अंकीत भस्के याचेकडुन अग्नीशस्त्रे विकत घेतल्याचे निष्पन्न झाले त्याने भस्के याचेकडुन आणखीन ०२ गावठी पिस्टल व
जिवंत काडतुस (राऊंण्ड) विकत घेतले होते व ते सराईत गुन्हेगार नामे तुषार नथुराम बच्चे, वय ३१ वर्षे, रा शिवाजीवाडी शिव क्लासीक सोसायटी समोर, मोशी पुणे याचेकडे ठेवण्यास दिलेले आहे असे निष्पन्न झाले. त्याअनुशंगाने सराईत गुन्हेगार तुषार बच्चे यास भारतमाता चौक, मोशी, पुणे येथुन ८१,००० रुपये किंमतीचे ०२ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस सह ताब्यात घेवुन नमुद गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे. त्यानंतर अग्नीशस्त्राची तरकरी करणारा (वेपन डिलर) अंकीत भस्के हा पारनेर पोलीस स्टेशन येथिल अग्नीशस्त्रे बाळगल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्हयामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये दुय्यम कारागृह, पारनेर, अहमदनगर येथे असल्याने त्यास तेथुन ताब्यात घेवुन सदर गुन्हयामध्ये अटक करुन त्याचेकडुन त्याने विक्री करीता आणलेले ८१,००० रुपये किंमतीचे ०२ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस हे जप्त करण्यात आले. अकीत भस्के याने आरोपी नामे कमल रामदास राठोड, २६ वर्षे, रा नानेकरवाडी, ता खेड, जि पुणे यास देखील गावठी पिस्टल व जिवंत काडतुस विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास हनुमान वाडी, आळंदी, पुणे येथुन ताब्यात घेण्यात आले व त्याचेकडुन ४१,००० रुपये किंमतीचे ०१ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे असे एकुण २,८५,००० रुपये किंमतीचे ०७ गावठी पिस्टल व ०५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेले आहे. नमुद गुन्हयाचा पुढील तपास हे दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी हे करीत आहे.
सदर गुन्हयातील अग्नीशस्त्राची तस्करी करणारा (वेपन डिलर) अंकीत भस्के याचेविरुध्द पिंपरी चिंचवड तसेच अहमदनगर येथे शरीराविरुध्दचे अपराध केल्याचे तसेच अग्नीशस्त्र बाळगणे व तस्करी करणे याबाबतचे गुन्हे नोंद आहे. सराईत गुन्हेगार अर्जुन सुर्यवशी याचेविरुध्द पिंपरी चिंचवड येथे खुनाचा प्रयत्न व मारामरी चे गुन्हे नोंद आहे. तसेच सराईत गुन्हेगार तुषार बच्चे याचेविरुध्द देखील पिंपरी चिंचवड मध्ये बेकायदा जमाव जमवुन दहशत निर्माण करणे व अग्नीशस्त्रे बाळगणेबाबतचे गुन्हे नोंद आहे.
दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या नेतृत्वामध्ये लोकसभा निवडणुक २०२४ ही सुरु असताना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये अग्नीशस्त्र जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात कडक कार्यवाही केली असुन जानेवारी २०२४ ते मे २०२४ पर्यंत दरोडा विरोधी पथकाकडुन एकुण ०५ गुन्हे दाखल करत ५,२९,५०० रुपये किंमतीचे एकुण १३ गावठी पिस्टल व १३ जिवंत काडतुसे (राऊंण्ड) जप्त करुन अग्नीशस्त्र विरोधीतील कार्यवाही मध्ये पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेमध्ये अव्वल कामगिरी केलेली आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरी ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो., मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री संदीप डोईफोडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे (अति. कार्यभार), श्री शिवाजी पवार, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, श्री बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, सागर शेडगे, राहूल खारगे, प्रविण कांबळे, प्रवीण माने, आशिष बनकर, गणेश हिंगे, चिंतामण सुपे, औदुंबर रोंगे, उमेश पुलगम, नागेश माळी, प्रमोद उलगे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

