कोंढवा येथील जागा प्रकरणात बिल्डर सुरेंद्र अग्रवालवर कोंढवा पोलीस स्टेशन तेथे गुन्हा दाखल….


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

महा पोलीस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- कोंढवा परिसरातील जागेवर ताबा मिळविण्यासाठी दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही जागा ताब्यात घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र अग्रवाल यांनी एका गटातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना लेखी अधिकारपत्र दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावरून कोंढवा पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

Advertisement

कोंढव्यातील कौसरबाग परिसरात ब्रह्मा काउंटी सोसायटीच्या मागे १२ जुलै रोजी सकाळी ६० ते ७० जणांचा जमाव जमला होता. त्यांच्यात एकमेकांना शिवीगाळ करून वाद सुरू होता. पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. त्यावेळी जमाव निघून गेला. परंतु त्यानंतर सायंकाळी दोन्ही गटांमध्ये एकमेकांना काठीने जोरदार मारहाण करण्यात आली. या प्रकरणात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान, बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र अग्रवाल याने ही जागा मिळविण्यासाठी एका गटातील तिघांना अधिकारपत्र दिले होते. वृद्धापकाळ आणि वैद्यकीय समस्यांमुळे प्रत्यक्ष जागेवर जाणे आणि संबंधित कामकाज पाहणे शक्य नाही, असे सांगत त्यासाठी ४० लाख रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी साडेसहा लाख रुपयांचा धनादेशही दिला आहेः ज्यांना ही रक्कम देण्याचे ठरले. त्यातील एकावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!