कोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी ! मोकातील १० महिन्यांपासून फरार आरोपीस केले जेरबंद


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

Advertisement

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.०४/०८/२०२५ रोजी कोंढवा तपास पथकाचे पोलीस अंमलदार विकास मरगळे व पुष्पेंद्र चव्हाण यांना त्यांचे बातमीदारामार्फत गोपनिय बातमी मिळाली की, कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं.१२१४/२०२४ भा.न्या.सं.क.११८ (१),११८(२), १८९(२),१८९(३),१९०,१०९,३(५) आर्म अॅक्ट कलम ४(२५), मपोका कलम ३७ (१) (३) सह १३५ सह मोका कायदा कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) मधील पाहिजे आरोपी नामे हर्ष संतोष जाधव हा श्रीराम चौक, कात्रज कोंढवा रोड येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव यांना कळविली. त्यांनी सदरची बातमी कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांना कळविली असता बातमीप्रमाणे खात्री करून कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केल्याने तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव पोलीस अंमलदार विकास मरगळे, पुष्पेंद्र चव्हाण, सुहार मोरे व लक्ष्मण होळकर यांनी सापळा लावून आरोपी नामे हर्ष संतोष जाधव, वय १९ वर्षे, रा. दत्त मंदिर जवळ, गल्ली नं ०४, गोकुळनगर, कोंढवा बु., पुणे हा श्रीराम चौक, कोंढवा बु., पुणे येथे आला असता त्यास शिताफीने ताब्यात घेवून त्यास दाखल गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, श्री. धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. नवनाथ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, सतिश चव्हाण, लक्ष्मण होळकर, विकास मरगळे, पुष्पेंद्र चव्हाण, सुहास मोरे, सुजित मदन, संतोष बनसुडे, अभिजीत जाधव, राहुल शेलार, विजय खेंगरे, राहूल थोरात, सुरज शुक्ला, अनिल बनकर, केशव हिरवे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!