छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांकरिता ई-ग्रंथालय उद्घाटन कार्यक्रम
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- पुस्तके आपल्या मनावर खोलवर परिणाम करतात आणि आपली मनस्थिती सुधारण्यासाठी मदरत करतात. पुस्तके ही व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरतात, जीवनात चांगले करण्याची प्रेरणा देतात व व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणतात. याच उदात्त हेतुने कारागृहातील बंद्यांना देखील त्यांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी त्यांच्यामध्ये चांगल्या गुणाची जोपासणा होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांना पारंपारिक ग्रंथालयाच्या माध्यमातुन मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू इत्यादी भाषेतील कथा, कादंबरी, मनोरंजन, ऐतिहासिक, तत्वज्ञान, कायदेविषयक इत्यादी विषयांची 2800 पर्यंत पुस्तके सध्यास्थितीत छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहातील ग्रंथालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परंतु काळानुरुप भौतिक साधनामध्ये आधुनिक तंत्राज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात कांती झालेली आहे. त्याचप्रमाणे ग्रंथालय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे ग्रंथालय आधुनिक तंत्राज्ञानाच्या जोडीने ई-ग्रंथालय झालेली असुन ई-ग्रंथालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पुस्तके वाचकांना उपलब्ध होत आहे. या तंत्रज्ञानाची कारागृहातील बंद्यांना देखील लाभ होवुन बंद्यांना जास्तीत जास्त पुस्तकांच्या माध्यमातुन ज्ञानसाठा उपलब्ध व्हावा. या उदात्त हेतुने मा.श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतुन कारागृहातील बंद्यांना ई-ग्रंथालय सुरु करण्यात येत आहे. ई-ग्रंथालयाच्या माध्यमातुन पी.डी.एफ स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम होती घेण्यात आलेला आहे.
त्यानुसार दिनांक 30.03.2024 रोजी छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांकरिता सुरु करण्यात आलेले ई-ग्रंथालयाचे उद्घाटन मा.श्री. यु.टी. पवार, कारागृह उपमहानिरीक्षक, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर यांचे शुभहस्ते पार पडले. सदर कार्यक्रमाच्या वेळी श्री. जयंत नाईक, अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह व श्री. प्रदिप रणदिवे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी व कारागृहातील अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच बंदी बांधव उपस्थित होते. ई-ग्रंथालय संगणकाच्या माध्यमातुन प्राथमिक स्वरुपात मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेतील एकुण-20,000 ई-पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. बंद्यांच्या मागणीनुसार आवडीनुसार ई-पुस्तेक बंद्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ई-ग्रंथालय उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मा. कारागृह उपमहानिरीक्षक, मध्यविभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी बंद्यांना ई-ग्रंथालयाचा जास्तीत-जास्त प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन केले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

