पुण्यात भारी ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.. मिसिंग व्यक्तीस डोंगरात खड्डा करुन गाडणाऱ्या आरोपींस ताब्यात घेवुन केली गुन्ह्यांची उखल
पंकेश जाधव संपादक 7020794626
सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर मनुष्य मिसींग रजिस्टर क्रमांक १३३/२०२४ दिनांक २३/०७/२०२४ मधील मिसींग व्यक्ती नामे बसवराज पुरवंत मंगळुरे (मंगिनमनी), वय २२ वर्ष रा. जाधवनगर, गल्ली नंबर १, निराकुंज बिल्डींग शेजारी, वडगाव बु. पुणे मुळ गाव मु पो तोळनुर, ता अक्कलकोट, जि सोलापर याचे तपासामध्ये बसवराज मंगळुरे हा त्याचा मित्र सौरभ रेणुसे रा. मु पो पाबे, ता. वेल्हा, जिल्हा पुणे याचेसोबत दि. १२/०७/२०२४ रोजी भात लावणीसाठी पाबे गावी गेला होता. दि. १३/०७/२०२४ रोजी बसवराज मंगळुरे हा मित्र सौरभ रेणुसे व रुपेश येणपुरे यांचेसोबत मु.पो रांजणे ता. वेल्हा, जिल्हा पुणे याठिकाणी टॉवरवर चढुन तार एक्सा ब्लेडने कापत असताना तार तुटुन बसवराज मंगळुरे हा टॉवर वरुन खाली जमिनीवर पडला. सौरभ रेणुसे, रुपेश येणपुरे यांनी बसवराज यास उपचारकामी हॉस्पीटलमध्ये न नेता रा. मु पो पाबे, ता. वेल्हा, जिल्हा पुणे येथील पाबे घाटाजवळील जमिनीत खड्डा करुन पुरले अशी माहीती प्राप्त झाली.
प्राप्त माहीतीच्या अनुषंगाने सिंहगड रोड पोलीस ठाणे कडील पोउपनि निंबाळकर, पोउपनि भांडवलकर, पोउपनि जायभाय, व इतर पोलीस स्टाफ यांनी रुपेश येणपुरे, सौरभ रेणुसे यांचेसह मु पो. पाबे, ता. वेल्हा, जिल्हा पुणे याठिकाणी जावुन स्थानिक पोलीसांची मदत घेवुन श्री. मयुर बनसोडे, निवासी नायब तहसीलदार, तालुका वेल्हा जि पुणे यांचेसमक्ष सौरभ रेणुसे याने दाखविलेल्या ठिकाणाची जमीन उकरली असता, सदर ठिकाणी बसवराज मंगळुरे हा गाडलेल्या अवस्थेत मिळुन आला.दाखल मनुष्य मिसींगचे तपासामध्ये मिसींग व्यक्ती बसवराज मंगळुरे यास सौरभ रेणुसे याने भात लावणीसाठी गावी नेवुन, नंतर मिसींग व्यक्ती बसवराज मंगळुरे, मित्र सौरभ रेणुसे, रुपेश येणपुरे असे मु पो रांजणे, ता वेल्हा, जि. पुणे येथे एमएसईबीचे टॉवरची तार चोरणेसाठी गेले असताना, सौरभ रेणुसे, रुपेश येणपुरे यांनी बसवराज मंगळुरे यास टॉवरवर तार कापण्यासाठी पाठविले असता, बसवराज मंगळुरे हा टॉवरवरुन खाली पडला. त्यावेळी त्यास सौरभ रेणुसे, रुपेश येणपुरे यांनी उपचारकामी हॉस्पीटलमध्ये न नेता, मु पो. पाबे, ता वेल्हा, जि पुणे येथील पाबे घाटातील जंगलात खड्डा करुन पुरलेबाबत निष्पन्न झाले.
सदर घटनेबाबत मयत इसम बसवराज मंगळुरे याची आई नामे श्रीदेवी पुरवंत मंगरुळे (मॅगिनमणी) वय ४० वर्ष रा. मु पो तोळणुर, ता. अक्कलकोट, जि. सोलापुर (मयताची आई) यांनी आरोपी नामे १. रुपेश अरुण येनपुरे, वय २५ वर्ष रा. मु पो पाबे, ता. वेल्हा, जिल्हा पुणे २) सौरभ बापू रेणुसे, वय २५ वर्ष, रा. मु पो पाबे, विठ्ठलवाडी ता. वेल्हा, जिल्हा पुणे यांचेविरुध्द दिले तक्रारीवरुन सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजिस्टर क्रमांक ००/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०५, २३८, ३०३ (२), ६२, ३(५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरचा प्रकार वेल्हा पोलीस स्टेशन हदीत घडला असल्याने, गुन्हा पुढील तपासकामी वेल्हा पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांचेकडे पाठविण्यात आला आहे. पुढील तपास वेल्हा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त साो, पुणे शहर मा. रंजणकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. प्रविण कुमार पाटील साो, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर मा. संभाजी कदम साो, पोलीस उपआयुक्त परीमंडळ ३, श्री अजय परमार सो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग श्री आनंदराव खोबरे साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राघवेंद्र क्षीरसागर सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक श्री संतोष भांडवलकर, सुरेश जायभाय, निकेतन निंबाळकर, पोलीस अंमलदार, सतिश नागुल, सुहास गायकवाड, सचिन गायकवाड, नवनाथ वणवे, शिवाजी क्षिरसागर, राजाभाऊ वेगरे, उत्तम तारु, यांचे पथकाने केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

