विमानतळ पोलीस स्टेशन भागात कारवाई करुन ४,६१,०००/-रु. किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज केला जप्त.


पंकेश जाधव संपादक 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखा पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पुणे शहरातील अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना दिलेल्या असून त्या अनुषंगाने आज दि.२६/०९/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच अधिनस्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना मिळालेले बातमीनुसार पोरवाल रोड निंबाळकरनगर, लेन नंबर २, पुणे येथील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे वैभव लक्ष्मण राठोड, वय १९ वर्षे, रा. ढवळकेवाडी, पोस्ट मालेवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी याच्या ताब्यातुन एकुण ४,६१,०००/- रु.कि.चा २२ किलो गांजा हा अंमली पदार्थ व इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, योगेश मांढरे, संदिप जाधव, दिशा खेवलकर, साहिल शेख, संदिप शेळके, अझिम शेख, नितीन जगदाळे, यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!