मॉर्निंग वॉक करणा-या महिलेचे गळयातील मंगळसुत्र हिसकावणा-या आरोपीच्या आवळल्या मुसक्या


पंकेश जाधव संपादक 7020794626

विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.२२/०९/२०२४ रोजी टिंगरेनगर येथे राहणाऱ्या महिला हया सनशाईन हॉटेलचे समोरील रोडवर, टिगरे नगर, लेन नं ०१ विमानतळ रोड, विश्रांतवाडी पुणे येथे मॉर्निंग वॉक करीत असताना त्यांचे पाठीमागून आलेल्या एका मोटार सायकलस्वारने त्यांचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र हिसका मारुन घेऊन पळून गेले बाबत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपीचा विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी अंमलदार हे शोध घेत असताना तपास पथकातील अंमलदार पोलीस अंमलदार अमजद शेख, संजय बादरे, संपत भोसले व किशोर भुसारे यांना बातमी मिळाली की, दाखल गुन्ह्यातील आरोपीने वापरलेले मोपेडचा नंबर एम.एच.१४ जे. डब्ल्यु. ४९७२ असा
असून सदरचा इसम हा आळंदी परीसरात राहण्यास आहे.
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याप्रमाणे आरोपीचा तांत्रिक विश्लेशन करुन आळंदी परीसरात शोध घेत असताना गुन्हयात वापरलेले मोपेडवरुन एक इसम वेगात जात असताना दिसल्याने पोलीसांनी त्यास पकडून चौकशी केली असता तो सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे देत होता परंतू त्यास पोलीस स्टेशन येथे आणून त्याचेकडे सखोल चौकशी करता त्याने त्याचे नाव कृष्णा उर्फ किशोर अशोक पवार वय २६ वर्षे, रा वडगाव घेणंद आळंदी ता. खेड जि. पुणे असे असल्याचे सांगून गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करून त्याचेकडे गुन्हयामध्ये चोरुन नेलेल्या मंगळसुत्राबाबत विचारपुस करता त्याने ते त्याचा मित्र नामे ओंकार रमेश चव्हाण रा आळंदी ता. खेड, जि. पुणे याचेकडे विक्रीसाठी दिले असल्याचे सांगीतल्याने त्याचा शोध घेवून त्याचेकडून दाखल गुन्हयात चोरीस गेलेले मंगळसुत्र हस्तगत करण्यात आले असून आरोपींकडून गुन्हयात वापरलेले मोपेड व सोन्याचे मंगळसुत्र असा एकुण ६६,०००/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, श्री. हिंमत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, श्रीमती अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे, श्रीमती कांचन जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), शंकर साळुंखे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी श्री नितीन राठोड, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!