तिरुपती ऊर्फ टक्या विठ्ठल लष्कर (टोळीप्रमुख) व त्याचे इतर तीन साथीदार यांचेवर मोक्काअंतर्गत कारवाई
पंकेश जाधव संपादक 7020794626
हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक ०१/१२/२०२३ रोजी फिर्यादी हे त्यांचे कानिफनाथ अमृततुल्य हॉटेल पीएमटी बस डेपो शेजारी, ढमाळवाडी, भेकराईनगर पुणे या त्यांच्या हॉटेलमध्ये असताना तिरुपती ऊर्फ टक्या लष्कर, रा पापडेवस्ती व शुभम करांडे, रा. पापडेवस्ती यांनी सन २०२१ मध्ये पापडे वस्ती येथे मर्डर केल्याने त्यावेळी फिर्यादी यांनी पोलीसांना मदत केली असल्याचे समजून त्यांच्या हॉटेलमध्ये येवुन त्यांच्या हॉटेलमधील खुर्य्या, टेबल फेकुन देवुन हॉटेलमधील काउंटरची काच फोडुन त्यांच्या हातातील लोखंडी धारदार शस्त्र हवेत फिरवुन फिर्यादी यांच्या अंगावर धावुन येवुन त्यांचेवर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच धारदार शस्त्रे हवेत फिरवुन मी आताच मर्डरमधुन बाहेर आलोय, जो कोणी माझ्याविरुध्द पोलीसांत तक्रार करेल त्याचा मी गेम करेन अशी धमकी दिली म्हणुन त्यांच्याविरुध्द तक्रार आहे वगैरे मजकुराची फिर्याद दिल्याने त्यांचे फिर्यादी वरून हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं.१८२६/२०२३, भादंवि कलम ४२७,३५२,३२३,५०४, ५०६,३४, कलमवाढ ३०७ सह महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७(१), (३) सह १३५प्रमाणे, आर्म अॅक्ट ४ (२५), क्रिमीनल लॉ अमेन्डमेन्ट अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
दाखल गुन्हयाचा तपासा दरम्यान सदरचा गुन्हा आरोपी नामे १) तिरुपती ऊर्फ टक्या विठठल लष्कर, वय २१ वर्ष रा. पापडेवस्ती पुणे. (टोळी प्रमुख) २) शुभम सुरेश करांडे, वय २२ वर्षे, रा. पापडेवस्ती, हडपसर, पुणे ३) अथर्व रविंद्र शिंदे, वय २१ वर्षे रा. साडेसतरा नळी, हडपसर पुणे (टोळी सदस्य) ४) एक अनोळखी इसम यांनी केला असल्याचे तपासात निष्पन्न झालेने दाखल गुन्हयात अ.नं.२ यास अटक करण्यात आलेली असुन इतर पाहिजे आरोपी आहेत.
यातील आरोपींनी दाखल गुन्हा हा हिंसक मार्गाचा अवलंब करुन स्वतःचे व स्वतःच्या टोळीचे वर्चस्व व दहशत रहावी म्हणुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्यासाठी तसेच नागरीकांच्या मनात भिती निर्माण करण्याकरीता केलेला असल्याचे तपासात निष्पन्न होत असल्याने त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा-पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.
यातील आरोपी यांनी संघटित दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१) (ii), ३ (२), ३ (४) चा अंतर्भाव करणेकामी हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके, यांनी सदरबाबत प्रस्ताव तयार करुन मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५. पुणे, श्री.आर राजा यांचे मार्फतीने मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री.रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रकरणाची छाननी करुन हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं.१८२६/२०२३, भादंवि कलम ४२७,३५२,३२३,५०४,५०६,३४, कलमवाढ ३०७ सह महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७(१), (३) सह १३५ प्रमाणे, आर्म अॅ.४ (२५), क्रिमीनल लॉ अमेन्डमेन्ट अॅक्ट कलम ०३ व ०७ अन्वये दाखल असलेल्या सदर गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३(४) चा अंतर्भाव करण्याची मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. रंजन कुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर श्रीमती अश्वीनी राख, ह्या करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे (मा. पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार) श्री. रामनाथ पोकळे मा अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५. पुणे श्री.आर. राजा मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर श्रीमती अश्विनी राख, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विश्वास डगळे, श्री. संदिप शिवले म. सहा. पो. निरी. सारिका जगताप, पोलीस उप-निरीक्षक सुशिल डमरे, हडपसर पो.स्टे. निगराणी पथकातील पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, महेश उबाळे, राजश्री खैरे, वसीम सय्यद, गिरीश एकोर्गे यांनी कारवाई केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईन लक्ष देवुन, शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही १०५ वी कारवाई आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

