शिकापुर पोलीसांची दमदार कारवाई ! २ चारचाकी वाहनासह ५३ किलो गांजा अंमली पदार्थ जप्त
शिकापुर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण,
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शिकापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यावर मा. वरीष्ठांचे आदेशा प्रमाणे अवैध धंद्याची माहीती काढुन कारवाई करणेकामी पोलीस निरीक्षक श्री दिपरतन गायकवाड यांनी अधिनस्त अंमलदार यांना वारंवार सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने शिकापुर पोलीस स्टेशनचे पोहवा/मिलींद देवरे यांना तळेगाव ढमढेरे गावचे हद्दीमधील तळेगाव ढमढेरे ते कासारी फाटा रोडवर २ स्कॉर्पीओ गाडीमध्ये गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहीती मिळाली होती.
सदरची बातमी पोहवा/मिलींद देवरे यांनी पोलीस निरीक्षक श्री दिपरतन गायकवाड यांना कळविली. मिळालेल्या बातमीची खातरजमा करणेकामी पोलीस निरीक्षक श्री दिपरतन गायकवाड यांनी तात्काळ वरीष्ठांना माहीत देवुन पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार, पंच व छाप्याकामी लागणारे वजनकाटा धारक, फोटोग्राफर यांना सोबत घेवुन तळेगाव ढमढेरे गावचे हद्दीतील तळेगाव ढमढेरे ते कासारी फाटा रोडवरील आयुष पार्क जवळ छापा टाकुन संशईत दोन स्कॉर्पीओ वाहनांची झडती घेतली असता, त्यामध्ये १४,००,०००/- रू. किंमतीच्या २ स्कॉर्पीओ कार नंबर एम एच १४ एफ एम २५५१ वएम एच १९ डी यु ९३४५ या २ गाडयांमध्ये इसम नामे १) वैष्णव वैजनाथ ढाकणे, वय २३ वर्षे, रा. हासनापुर, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर, २) स्वप्नील गोरक्षनाथ खेडकर, वय २२ वर्षे, रा. एकनाथवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर, ३) शुभम बंडु जवरे, वय २१ वर्षे, रा. वाडगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर, ४) तुषार रामनाथ जवरे, वय २१ वर्षे, रा. वाडगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर, ५) अक्षय कांतीलाल आव्हाड, वय २६ वर्षे, रा. नायरा पंप रोड, करमाळा रोड, राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर, ६) हर्षद देविदास खेडकर, वय २० वर्षे, रा. एकनाथवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर हे मिळून आले. त्यांचे ताब्यात ५,६०,७४०/- रू. किंमतीचा ५३.०६५ किलो ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला. पोलीसांनी मिळुन आलेला १९,६०,७४०/- रू. किंमतीचा मुद्देमाल पंचनाम्यानी जप्त केला आहे. सदर कारवाई प्रकरणी पोहवा/मिलींद देवरे यांनी मिळुन आलेल्या ६ आरोपींविरूध्द दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री दिपरतन गायकवाड यांचे मार्गदर्शनान्वये पोलीस उपनिरीक्षक श्री महेश डोंगरे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा.श्री. पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक साो, पुणे ग्रामीण, मा.श्री. रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक पुणे, मा.श्री. प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर यांचे मार्गदर्शनाखाली मा. दिपरतन गायकवाड पोलीस निरीक्षक शिकापुर पोलीस स्टेशन, श्री संदीप साळुंखे सहा. पोलीस निरीक्षक, श्री महेश डोंगरे पोलीस उपनिरीक्षक यांचेसह ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, सफौ/शंकर साळुंके, लहानु बांगर, पोहवा/नवनाथ नाईकडे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, मिलींद देवरे, विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, जयराज देवकर यांचे पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

