गुन्हे शाखा, युनिट ५ पिंपरी चिंचवड यांची उल्लेखनीय कामगिरी ! खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करून ११ आरोपींना १२ तासाच्या आत अटक
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट ५ पिंपरी चिंचवड शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. वरिष्ठांच्या आदेशाने व सुचनेनुसार वपोनि किशोर पाटील गुन्हे शाखा युनिट-५ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि राहुल कोळी, पोहवा ७९४ पवार, पोहवा/४९९ माने, पोहवा १५५५ सुर्यवंशी, पोहवा १६०८ मालुसरे, पोशि १३०५ खेडकर, पोशि १३०३ इघारे, पोशि २०१७ भोसले, पोशि/१८९८ गाडेकर, पोशि/२५९१ नागरे असे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर १८/२०२५ भा.न्या.सं.क १०३. (१), ६१ (२),१२६(२), १८९(१),१८९(२), १८९(४), १९०, १९१(३) भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४(२५) क्रि. लॉ अर्मेन्टमेंन्ट कलम ७ सह महा.पो.का.क. ३७ (१) अन्वये दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत आसतांना सदर पथकाने गुन्ह्याचे घटनास्थळावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदर गुन्हा हा ११ आरोपींनी संगनमत करुन केला असल्याचे निष्पन्न केले.
त्यानंतर गुन्हे शाखा युनिट-५ कडील पथकाने सदर आरोपीचा शोध घेवुन त्यापैकी आरोपी नामे १) शिवराज भागप्पा कोळी वय २० वर्षे रा. समता कॉलनी वराळे ता. मावळ जि. पुणे मुळ रा. नागलसुर ता. अक्कलकोट जि. सोलापुर, यांस अथर्व हॉस्पिटल तळेगाव दाभाडे येथून तसेच २) सुरज लक्ष्मण निर्मळ वय-२२ वर्षे सध्या रा. मुजोंबा वसाहत चिंचवडे नगर वाल्हेकरवाडी पुणे मुळ रा. मुळुकवाडी ता. जि. बीड यास मुजोंबा वसाहत चिंचवडे नगर वाल्हेकरवाडी येथुन तसेच बालक नामे ३) बालक वय १६ वर्षे ४) बालक वय- १७वर्षे ५) बालक वय १६ वर्षे यांना पुणे रेल्वे स्टेशन येथून तसेच ६) बालक वय १७ वर्षे यास राजारामनगर, साई चौकाजवळ, सांगवी पुणे येथून शिताफीने ताब्यात घेवुन त्यांच्याकडे कसुन चौकशी केली असता आरोपी नामे १) शिवराज कोळी २) सुरज निर्मळ ३) बालक वय १६ वर्षे ४) बालक वय १७ वर्षे ५) बालक वय १६ वर्षे ६) बालक वय १७ वर्षे व इतर ०५ आरोपी यांनी मिळुन शिवराज भागप्पा कोळी याचा भाऊ संतोष कोळी यास मयत नामे आर्यन बेडेकर याने त्याचे साथीदारांना सोबत घेवून मारहान केले असल्याचा राग मनात धरुन दि.३१/०१/२०२५ रोजी सायंकाळी ०५ : ४५ वा. चे सुमारास सरस्वती शाळेजवळ, वराळे रोड, तळेगाव दाभाडे येथे आर्यन बेडेकर याचा लोखंडी कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करुन खुन केला असल्याची कबुली दिली आहे. आरोपी नामे १) शिवराज भागप्पा कोळी वय २० वर्षे रा. समता कॉलनी वराळे ता. मावळ जि. पुणे मुळ रा. नागलसुर ता. अक्कलकोट जि. सोलापुर, यांस अथर्व हॉस्पिटल येथून तसेच २) सुरज लक्ष्मण निर्मळ वय-२२ वर्षे सध्या रा. मुजोंबा वसाहत चिंचवडे नगर वाल्हेकरवाडी पुणे मुळ रा. मुळुकवाडी ता. जि. बीड, बालक नामे ३) बालक वय १६ वर्षे ४) बालक वय १७ वर्षे ५) बालक वय- १६ वर्षे ६) बालक वय- १७ वर्षे यांना पुढील कारवाई कामी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले असुन इतर ०५ पाहीजे आरोपींचा गुन्हे शाखा युनिट-५ कडुन शोध सुरु आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो., मा. सह पोलीस आयुक्त श्री. डॉ. शशिकांत महावरकर सो.. मा.अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सो., मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, संदीप डाईफोडे सो.. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. विशाल हिरे सो., यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व सुचनाप्रमाणे श्री. किशोर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ५, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि राहुल कोळी, पोहवा ७९४ पवार, पोहवा/४९९ माने, पोहवा १५५५ सुर्यवंशी, पोहवा १६०८ मालुसरे, पोशि १३०५ खेडकर, पोशि १३०३ इघारे, पोशि २०१७भोसले, पोशि/१८९८ गाडेकर, पोशि/२५९१ नागरे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

