मोबाईल हिसकावुन चोरणारा जेरबंद तीन लाख बावीस हजार रुपये किंमतीचे मोबाईल जप्त
सुनिल सांगळे पत्रकार पुणे जिल्हा
गुन्हे शाखा युनिट २ पिंपरी चिंचवड शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :– पिंपरी चिंचवड शहरातील गर्दीची ठिकाणे यामध्ये पिएमटी बसथांबे, एसटी बसस्थानके, बाजारपेठा, आठवडी बाजार भरण्याची ठिकाणे या ठिकाणी वारंवार मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना घडत असल्याने मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे साहेब यांनी मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले आहे. झारखंड राज्यामुधन आलेले काही सराईत चोरटे शहरात गर्दीचे ठिकाणी नागरिकांचे महागडे मोबाईल हिसकावुन चोरी करुन चोरीचे मोबाईल स्वस्तात विक्री करीत असल्याची माहीती मिळालेने गुन्हे शाखा पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे व सहा. पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गाकवाड यांनी मोबाईल चोरट्यांचा शोध घेणेसाठी माहीतगार पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन वारंवार मोबाईल चोरीच्या घटना घडत असलेल्या ठिकाणांची सखोल माहीती घेत
दिनांक ३०/०१/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार संदेश देशमुख व तेजस भालचिम यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी माहीती मिळाली कि, एक संशयित इसम इसम त्याचे सॅक बॅगमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे अत्यंत महागडे अॅन्ड्राईड मोबाईल घेवून पवळे ब्रीज परिसरात विक्रीच्या उद्देशाने संशयितरित्या फिरत आहे अशी खात्रीशीर माहीती मिळालेने वपोनि गायकवाड यांचे अधिपत्याखाली पोलीस उप निरीक्षक गणेश माने, पोउनि दिपक खरात, पोलीस अंमलदार देवा राऊत, संदेश देशमुख, तेजस भालचिम यांनी बातमीप्रमाणे सापळा लावुन पोलीस आल्याची चाहूल लागताच पळून जाण्याच्या तयारीत असलेला इसम नामे जगदीश रामप्रसाद महतो वय ३१ वर्षे मुळ रा. नया टोला, कल्याणी महाराजपुर बाजार, साहेबगंज राज्य झारखंड सध्या पुणे रेल्वे स्टेशन यास पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडील सॅक बॅगमध्ये अॅपल आयफोन, विवो, ओपो, रियलमी, रेडमी अशा वेगवेगळ्या कंपनीचे एकूण १६ अॅन्ड्राईड मोबाईल मिळुन आले. त्याबाबत त्याचेकडे सखोल विचारपुस केली असता त्याने वेळोवेळी निगडी, पिंपरी, चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण अशा गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेवून मोबाईल हिसकावुन चोरल्याची कबुली दिली. मोबाईल चोरीबाबत उघडकीस आलेले गुन्हे-
१) निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ३२/२०२५ BNS ३०३ (२)
२) पुणे ग्रामीण दौंड पोलीस ठाणे गुन्हा रजि. ७५/२०२५ BNS ३०३ (२)
३) स्वारगेट पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ३२/२०२५ BNS ३०३ (२)
४) सासवड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ३२/२०२५ BNS ३०३ (२)
निष्पन्न आरोपी जगदीश रामप्रसाद महतो वय ३१ वर्षे मुळ रा. नया टोला, कल्याणी महाराजपुर बाजार, साहेबगंज राज्य झारखंड सध्या पुणे रेल्वे स्टेशन याचेकडून एकूण ३,२२,०००/-रुपये किंमतीचे १६ अॅन्ड्राईड मोबाईल जप्त करण्यात आले असुन मोबाईल चोरीबाबत अधिक तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश गायकवाड, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, दिपक खरात, पोलीस हवालदार देवा राऊत, संदेश देशमुख, तेजस भालचिम यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

