केशव नगर मुंढवा परिसरात अनधिकृत बांधकामांना महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून अभय…
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पुणे महानगर पालिका उपनगरात केशव नगर मुंढवा परिसरात मोठ्या प्रमाणत अनधिकृत बांधकाम चालू असताना महापालिका अधिकारी तुटपुंजी कारवाई दाखवून बांधकामाना अभय देण्यात येत असल्याचे स्थानिक नागरिकांडून चर्चा आहे.
सर्व नंबर २५ लोणकर वस्ती केशव नगर मुंढवा पुणे या ठिकाणी बिल्डर ( आबान अली, श्रीनिवास यादव आणि भाई रेडी) यांचे चार पाच मजली अनधिकृत इमारतीचे बांधकाम चालू असून तब्ब्ल चार वेळा बांधकाम विभागाकडून तुटपुंजी दिखाऊपनाची कारवाई करण्यात आली असून नवीन येणारा अधिकारी इमारतीच्या छतला चार भोके पडून निघून जातो बांधकाम व्यवसायिक परत भोके बुजूवून बांधकाम चालू ठेवतो. या मुळे ही इमारत ढीसूळ झाली असून घर घेणाऱ्या ग्राहकाची फसवणूक होणार आहे. तसेच पुणे महानगर पालिकेचा महसूल बुडणार आहे असे असताना ही इमारतीचे काम चालू कसे राहते संबंधित बांधकाम व्यवसायिक यांच्या वर कारवाई करण्यात महापालिका असमर्थ का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
संबंधित इंजिनियर अधिकारी गोपाल भंडारी बांधकाम विभाग १ यांना सांगितले अगोदर दोन वेळेस कारवाई झाली असून कारवाईला न जुमानता राजरोष पणे काम चालूच आहे यामुळे हा प्रश्न निर्माण होतो मी अधिकारी कारवाई करायला कमी पडतात का या माघे दुसर काही गुपित दडले आहे का…
मानवी अधिकार संरक्षण संघटन च्या पुणे शहर अध्यक्ष इक्बाल सय्यद यांनी निवेदन देऊन सुद्धा जुजबी कारवाई करण्यात आली आहे.कमाउंड च्या विटा पडल्या आणि किरकोळ स्वरूपाची कारवाई केली आहे..
मानवी अधिकार संरक्षण संघटन च्या पुणे शहर अध्यक्ष इक्बाल सय्यद यांनी सांगितले आहे की जमीन उध्वस्त कारवाई नाही झाली तर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात येणार आहे असा त्यांनी सांगितले आहे…

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

