सराईत गुन्हेगाराकडून वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस
पंकेश जाधव संपादक 7020794626
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- भारती विदयापीठ पोलीस ठाणेकडील वाहनचोरी गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अंमलदार चेतन गोरे, हनुमंत मासाळ, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, हे भारती विदयापीठ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोंलिंग करत असताना नमूद अंमलदाराना बातमी मिळाली की, पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार नामे आरोपी अर्जन गणपत गायकवाड वय १८ वर्षे रा. गोकुळनगर कात्रज कोंढवा रोड, पुणे हा भारती विदयापीठ पोलीस ठाणे कडील तसेच कोंढवा पोलीस ठाणेचे हद्दीतून दुचाकी चोरी केली आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वपोनि श्री. डी. एस. पाटील भारती विदयापीठ पोलीस ठाणे, पुणे शहर यांना कळविली असता त्यांनी तपास पथकाचे सपोनि कदम व आम्हाला कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले.
त्याप्रमाणे सदरचा सराईत गुन्हेगाराची गुप्त माहिती काढत असताना नमूद सराईत आरोपी हा गोकुळनगर येथे आला असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावून नमूद आरोपीस ताब्यात घेवून सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार नामे साजन विनोद शाह वय २१ वर्षे रा.धायरी पुणे याचेसोबत मिळून केला असल्याची कबुली दिली. नमूद आरोपीकडून भारती विदयापीठ पोलीस ठाणेकडील ०१ व कोंढवा पोलीस ठाणे कडील ०१ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ पुणे श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदिनी वग्यानी वरीष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ, पुणे श्री. दशरथ पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे, भारती विदयापीठ पो.स्टे. पुणे शहर श्री. शरद झिने, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि समीर कदम, पोउनि निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार नामेदव रेणुसे, शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हनुमंत मासाळ, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, निलेश जमदाडे, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचीन गाडे, सतीश मोरे, मितेश चोरमोले, अवधतु जमदाडे, अभिनय चौधरी, सागर बोरगे, यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

