भारती विद्यपीठ पोलीस स्टेशन ची दमदार कामगिरी! रिक्षा चालकास लुटणारा सराईत आरोपी जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :-दिनांक २२/०७/२०२४ रोजी दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना पॅसेंजर असल्याचा बहाणा करुन त्यांना सुंदरनगर, कात्रज, पुणे येथील डोंगराजवळ घेवुन जावुन फिर्यादी यांचे रिक्षा, मोबाईल फोन, व रोख रक्कम असा एकुण ५४,८००/- रुपयांचा माल जबदरस्तीने हिस्कावुन चोरी केला म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६१६/२०२४, भारतीय न्याय संहीता कलम ३०४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेणेबाबत मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, अवधुत जमदाडे हे अनोळखी आरोर्षीचा शोध घेत असताना त्यांना सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी राहुल संजय क्षिरसागर, वय २२ वर्षे, रा. सुंदरनगर, मांगडेवाडी, जुन्या पाण्याचे टाकीसमोर, कात्रज, पुणे याने गुन्हा केल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार सदर आरोपीचा शोध घेतला असता तो कात्रज तलाव येथे मिळुन आल्याने त्याचेकडे तपास करुन त्याचा नमुद गुन्हयामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक केले आहे. अटके दरम्यान आरोपीकडे तपास करता त्याचेकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
१. भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर ६१६/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम ३०४, ३(५) २. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६११/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (६), ३(५) ३. कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६४६/२०२४, भादंवि कलम ३७९,३४
Advertisement
सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, श्रीमती नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी.एस.पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमाले, अवधुत जमदाडे, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, महेश बारवकर, चेतन गोरे, निलेश जमदाडे, हनमंत मासाळ, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, सतिश मोरे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

