परराज्यातुन येवुन मोबाईल चोरणा-या सराईताना चंदननगर पोलीसांनी ठोकल्या बेडया


पंकेश जाधव संपादक 7020794626

चंदननगर पोलिस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे  :- तक्रारदार नामे- अजरूल जियार मंडल, यय-२२ वर्षे, बंदा मजुरी, रा- संभाजी एस. धुमाळ यांची बिल्डींग, स.नं.४१/१/२खे, ग्राऊंड फ्लोअर, चौधरी वस्ती, चंदननगर पुणे यांनी दिलेल्या तक्रारी यरून चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंगर १०१/२०२४, भादवि कलम ३८० अन्वये गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्हयाचा तपास चंदनननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करत असताना दि.२७/०२/२०२४ पोलीस अंमलदार ८३६१ विकास कदम, १०१९६ नामदेव गडदरे, यांना त्यांचे गोपनीय बातमीदार यांचे मार्फत बातमी मिळाली की, एक महिला व एक पुरुष शिवाजी महाराज पुतळा, ‘भाजी मंडई, चंदननगर पुणे येथे चोरीचे मोबाईलफोन विक्री करीता घेवुन आले आहेत अशी बातमी मिळाल्याने सदर बातमी बाबत माहीती वरीष्ठांना कळवुन वरीष्ठांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भाजी मार्केट या विकाणी रवाना होवुन तेथे बातीमीतील वर्णनाप्रमाणे एक महिला व एक इसम उभे असल्याने दिसल्याने त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे- १) किरण अमरसिंग नटमारवाडी, वय १९, रा. स्वराज नगरी, परिसरातील मोकळया जागेतील इझोपडयामध्ये तळेगाव दाभाडे, जि. पुणे, मुळ पत्ता: नडीयाद, जवाहरनगर, सिंधी शाळेमागे, खेडा गुजरात, २) महिला नामे मांगि अमरसिंग नटमारवाडी, वय ४७ रा. स्वराज नगरी, परिसरातील मोकळया जागेतील झोपडयामध्ये तळेगाव दाभाडे, जि. पुणे, मुळ पत्ता: नडीयाद, जवाहरनगर, सिंधी शाळेमागे, खेडा गुजरात असे असल्याचे सांगितल्याने त्यांची झडती घेतली असता त्यांचेकडे मिळून आलेल्या ०३ मोबाईल बाबत विचापुस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यांना पुढील चौकशी कामी चंदननगर पोलीस स्टेशनला आणुन पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे ०८ मोबाईल काढुन दिले असुन एकुण ५४,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तान्हाजी शेगर करत आहेत.

Advertisement

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर- श्री अमितेश कुमार, मा.सह पोलीस आयुक्त पुणे शहर- श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्री. संजय पाटील साो, यांचे मार्गदर्शनाखाली मा. मनीषा पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, तपास पथक प्रभारी अधिकारी पो.उप. निरीक्षक तान्हाजी शेगर, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, विकास कदम, नामदेव गडदरे, श्रीकांत शेंडे, शेखर शिंदे, विष्णु गोने, श्रीकांत कोद्रे, महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी थांडे, सुरज जाधव, गणेश हांडगर, ज्ञानोबा लहाणे, नितीन कांबळे, गजानन पवार, मपोशि वर्षा सावंत यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!