परजिल्हयात घरफोडी चोरी करुन धुमाकुळ घालणा-या अट्टल चोरटयाला जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
युनिट ५ गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :– सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २२६/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ),३३१ (३) हा गुन्हा पोलीस रेकॉर्डवरील अट्टल चोरटा बबलुसिंग टाक याने व त्याचे इतर साथिदारांनी केला होता. आरोपी नामे. बबलुसिंग टाक हा दाखल गुन्हयामधील पाहिजे आरोपी असुन तो त्याची स्वतःची अटक चुकवुन सांगली ग्रामीण पोलीसांना चकवा देवुन वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करीत होता.
दि.२८/०९/२०२४ रोजी युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाकडील पोलीस स्टाफ हे रेकॉर्डवरील आरोपी चेक करीत असताना पाहिजे आरोपी नामे. बबलुसिंग टाक हा सातववाडी हडपसर पुणे या ठिकाणी असल्याची पोलीस पथकाला माहिती मिळाल्याने त्याचा शिताफीने पाठलाग करुन ताब्यात घेतले. आरोपी नामे. बबलुसिंग पंजाबसिंग टाक, वय ४२ वर्षे, रा. महात्मा फुले वसाहत हा सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनकडील घरफोडीच्या गुन्हयामधील पाहिजे आरोपी असल्याने त्यास सबंधीत पोलीस स्टेशनकडील पोलीस स्टाफचे ताब्यात दिलेले आहे.
आरोपी नामे. बबलुसिंग टाक याने व त्याचे इतर साथिदारांसह सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन, विटा पोलीस स्टेशन व संजयनगर पोलीस स्टेशन इत्यादी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये एकुण ०५ घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदर आरोपी हा ०५ गुन्हयामध्ये पाहिजे आरोपी होता.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे, सपोनि. कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार विनोद शिवले, अकबर शेख, राजस शेख, प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, अमित कांबळे, उमाकांत स्वामी, प्रताप गायकवाड, शशिकांत नाळे, पृथ्वीराज पांडुळे, विनोद निंभोरे, संजयकुमार दळवी, म. पोलीस अंमलदार शुभांगी म्हाळशेकर व स्वाती गावडे यांचे पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

