दुकानदाराचे गल्यावर डल्ला मारणा-या रेकॉर्डवरील आरोपीस केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १२/०८/२०२४ रोजी फिर्यादी हे त्यांचे कात्रज कोंढवा रोड, पुणे येथील दुकानामध्ये असताना तीन अनोळखी इसमांनी खराटा खरेदी करण्याचे बहाण्याने येवून फिर्यादी यांना बोलण्यामध्ये गुंतवून त्यांचे चौथे साथीदाराने फिर्यादी यांचे पाठीमागून येवून दुकानातील काऊंटरमधील गल्ल्यातून रोख ४५,०००/- रुपये फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरुन नेली आहे म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर ६५३/२०२४, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेणेबाबत मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, अवधुत जमदाडे यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता त्यामध्ये त्यांना सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी मोहन ऊर्फे मनोज लक्ष्मण राठोड ऊर्फ कडावत, वय २९ वर्षे, रा. सुंदरनगर, पाण्याची टाकीजवळ, कात्रज, पुणे याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार नमुद आरोपीचा शोध घेतला असता तो त्याचे राहते घरी मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक केली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी.एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमाले, अवधुत जमदाडे, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, महेश बारवकर, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, निलेश जमदाडे, हनमंत मासाळ, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, सतिश मोरे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांच्या पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!