गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस गुन्हे शाखा युनीट २ ने केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना पुणे शहरामध्ये वेगवगळ्या पोलीस स्टेशनचे हददीत पाहिजे आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार राहुल शिंदे यांना बातमी मिळाली की येरवडा पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजि क्रमांक १८८/२०२३ भादविक ३२६,३२४,३४ शस्त्र अधिनियम ४/२५ मधील पाहिजे आरोपी हरिकेश टुणटुण चव्हाण वय १९ वर्ष रा. ओकार सोसायटी लेन नंबर २ बाबुल बिल्डिंग वडगाव शेरी पुणे सध्या रा गायकवाड वस्ती हा स्वारगेट चौकाजवळ थांबलेला आहे त्याबाबत माहिती मिळाली असता. त्याबाबत युनिट २ कडील पथकाने गुन्हयातील पाहिजे आरोपीस ताब्यात हरिकेश चव्हाण यास ताब्यात घेवुन पुढील कायदेशीर कारवाईकामी येरवडा पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री. गणेश इंगळे यांचे मागदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस अंमलदार राहुल शिंदे, संजय जाधव, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, म. पोलीस अंमलदार साधना ताम्हाणे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!