गणेशोत्सव सणानिमित्त कारागृह बंदी निर्मित पर्यावरण पुरक गणेश मुर्तींचे व इतर वस्तुंचा प्रदर्शन व विक्री मेळावा उद्घाटन सोहळा


पंकेश जाधव संपादक 7020794626

अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती 

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन अमरावती  :- आज दि.२९.०८.२०२४ रोजी अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे मा. प्रशांत बुरडे (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतुन व मा. श्रीमती. स्वाती साठे कारागृह उपमहानिरीक्षक, पुर्व विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली कारागृहाचे उडाण विक्री केंद्र येथे गणेशोत्सव सणानिमित्त कारागृह बंदी निर्मित पर्यावरण पुरक गणेश मुर्तींचे व इतर वस्तुंचा प्रदर्शन व विक्री मेळावा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला. कारागृह उद्योग अंतर्गत बंद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातुन “गणेशोत्सव सणानिमित्त” कारागृह निर्मित वस्तुंचे विक्री व प्रदर्शन मेळाव्याचे उद्घाटन मा. श्री.नविनचंद्र रेड्डी, पोलीस आयुक्त अमरावती यांच्या शुभहस्ते तर मा.श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस उप-आयुक्त,अमरावती, मा.श्री.सागर पाटील पोलीस उप-आयुक्त, अमरावती शहर, मा. श्रीमती किर्ती चिंतामणी, अधीक्षक, अमरावती मध्यवर्ती कारागृह ,मा श्री प्रदीप इंगळे, उप अधीक्षक यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!