बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कोंढवा पोलीसाकडुन धडक कारवाई


पंकेश जाधव संपादक 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर.

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर चालु असणा-या अवैध धंदयाचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांनी आदेशित केले होते. सदर आदेशाप्रमाणे दि.२९/०८/२०२४ रोजी रात्रगस्त अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे व पोलीस अंमलदार असे पेट्रोलिंग करुन बेकायदेशीर व चोरुन चालु असणाऱ्या अवैध धंदयाचा शोध घेत होते. तसेच गुप्त बातमीदाराकडुन माहिती काढत होते. तेव्हा त्यांना माहिती मिळाली की, एनआयबीएम रोड येथील द व्हिलेज हॉटेल, मध्ये चोरुन ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का पिण्यासाठी उपलब्ध करुन दिला जात आहे. तेव्हा सदर ठिकाणी छापा टाकुन कारवाई केली असता द व्हिलेज हॉटेलचे चालक १) बाकिर रमेश बागवे, वय ३६ वर्षे, रा भवानी पेठ लोहियानगर फ्रायर ब्रिगेड पुणे समोर, पुणे २) हरुन नबी शेख, वय २५ वर्षे, रा. मालुंचाइस्ट्री थना शांतीपुर जि नोदीया, पश्चिम बंगाल, ३) बिक्रम साधन शेख, वय २० वर्षे, रा. सदर ४) अमानत अन्वर मंडळ, वय २२ वर्षे, रा. सदर ५) अमानत अन्वर रा. सदर हे ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का पुरवित असल्याचे दिसुन आले. सदर इसमांकडुन २३,५००/- रु कि तंबाखुजन्य हुक्काचे फलेवर व ९ काचेचे हुक्काचे पॉट व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच सदर इसमांच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाणे येथे गुरन.१०१०/२०२४ सिंगारेट व अन्य तबाखुजन्य उत्पादने अधि. २०१८ चे कलम. ४(अ) २१ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Advertisement

सदरील कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परि.०५, श्री.आर राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग (अतिरिक्त कार्यभार) श्रीमती अश्विनी राख, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. मानसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार अक्षय शेंडगे, राहुल थोरात, सुहास मोरे, प्रदिप बेडिस्कर यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!