चार वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देणा-या खुनाच्या गुन्हयामधील ०२ आरोपींना जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
युनिट ५ गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ९०७/२०२० भादवि कलम ३०२,१२० (ब),१४३, १४७,१४८,१४९ व भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ या गुन्हयामधील मयत इसम याचा गुन्हयामधील मुख्य आरोपी हेमंत रमेश नाईकनवरे व त्याचे इतर साथिदारांनी खुन केला म्हणुन त्याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला होता. पोलीसांनी दाखल गुन्हयामधील मुख्य आरोपी व त्याचे इतर साथिदारांना अटक करणेत आलेली होती. परंतु गुन्हयामधील सह आरोपी शुभम कांबळे व आनंद माने हे पाहिजे आरोपी होते. पाहिजे आरोपींनी त्यांचे साथिदारांसह वरील गुन्हा केला आहे याची त्यांना जाणीव असुन देखील ते त्यांची स्वतःची अटक चुकवुन वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव करीत होते.
दि.२८/०९/२०२४ रोजी युनिट ५ गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाकडील पोलीस अंमलदार विनोद शिवले, अकबर शेख, अमित कांबळे यांना दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे. शुभम कांबळे व आनंद माने हे गंगानगर स्मशानभुमी येथे थांबले असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने लागलीच युनिट ५ कडील पोलीस पथकाने सदर ठिकाणी जावुन तपास करुन पाहिजे आरोपी नामे. शुभम शरद कांबळे वय २३ वर्षे रा.लेन नंबर ०८, लक्ष्मी कॉलनी गंगानगर, फुरसुंगी पुणे व आनंद नागेश माने वय २४ वर्षे रा. सदर यांना ताब्यात घेवुन त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केल्याने त्यांना हडपसर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे, सपोनि. कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार विनोद शिवले, अकबर शेख, राजस शेख, प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, अमित कांबळे, उमाकांत स्वामी, प्रताप गायकवाड, शशिकांत नाळे, पृथ्वीराज पांडुळे, विनोद निंभोरे, संजयकुमार दळवी, म. पोलीस अंमलदार शुभांगी म्हाळशेकर व स्वाती गावडे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

