मोबाईल स्नॅचिंग चोरट्यास बिबवेवाडी पोलीसांनी अटक करून १० मोबाईल जप्त केले
आकाश पांचाळ सह-संपादक
बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदरबाबत अधिक माहिती अशी की, दि. २७/१२/२०२४ रोजी सकाळी १०/०० वाजता फिर्यादी हे गंगाधाम येथे मजुरी कामासाठी गेले व संध्याकाळी ०६/०० वाजता फिर्यादी हे काम संपवून घरी पायी अप्पर डेपो बाजुकडील रोड ने चामुंडा स्वीट कडे जात असताना भुत बंगला जवळ आले असता अंदाजे ०७/०० वाजता तीन ते चार मुले एका मुलाला मारत होते त्याचे वर्णन वय अंदाजे १८ ते २१ पॅन्ट शर्ट घातलेले तेव्हा फिर्यादी यांनी त्याच्याकडे पाहीले असता त्यांनी फिर्यादीला पण धरून हाताने मारहाण करून त्यांच्या मोबाईल खिशातुन काढून घेतला व जमीनीवरील दगड उचलून फिर्यादीचा डोक्यात डोळयाखाली व पायावर मारले फिर्यादीचा डोक्यातुन रक्त आल्याने ते घाबरून तेथून पळून गेले.
म्हणुन फिर्यादी यांनी अनोळखी मुलांविरुध्द तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा ३३४/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (६), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस उप निरीक्षक विवेक सिसाळ तपासपथकातील अमंलदार, यांनी गुन्हयाचे घटनाठिकाणी भेट देवून सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल चे सीडीआरवरून पोलीस अमंलदार विशाल जाधव व आशिष गायकवाड, यांना त्यांचे बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरून दाखल गुन्हयातील संशयीत इसम तन्मय पृथ्वीराज भैसडे, वय १९ वर्षे रो. प्रियदर्शनी चाळ, राजीव गांधीनगर अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे.. यास दिनांक २८/१२/२०२४ रोजी अटक करून त्याचेकडे दाखल गुन्हयाबाबत अधिक तपास करता त्याने दाखल गुन्हा केल्याचे कबुल केले.
त्याचेकडे गुन्हयाचे तपासामध्ये फिर्यादी व साक्षीदार यांचे चोरी करून नेलेले कि.रू. २,५०,०००/-रुपयांचे वेगवेगळया कंपनीचे महागडे एकूण १० मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. नमुद आरोपीकडून १) बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.३३४/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (६), ३ (५) प्रमाणे २) बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.३१९/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०४,३ (५) असे जबरी चोरी चे दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्ष श्री विवेक सिसाळ हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे, तपासपथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री विवेक सिसाळ, पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अमंलदार विशाल जाधव, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, नितीन धोत्रे, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, प्रणय पाटील व अजय कामटे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

