बालकाकडुन १ चैन स्नॅचिंग, २ घरफोडी गुन्हे उघडकीस, २,००,०००/- रु.चा ऐवज केला हस्तगत


पंकेश जाधव संपादक 7020794626

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी अभिलेखावरील उघडकीस न आलेल्या जबरी चोरी, घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.

त्याप्रमाणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकार व अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.०३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५) या चैन स्नॅचिंगचे गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांना त्यांचे बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा रेकॉर्ड वरील बालक व त्याचे साथीदारांनी मिळून केला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याचा शोध घेत असताना तो बालक कात्रज कोंढवा रोडवरील पेरुची बाग येथे त्याचे कडील असलेल्या मोटार सायकलसह मिळुन आला. त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. बालकाकडे केले चौकशीमध्ये त्याचेकडुन भारती विद्यापीठ कडील एकूण ४ गुन्हे उघडकीस आले असुन त्याचेकडून १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दुचाकी वाहन असे एकुण २,००,०००/- रु.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उप आयुक्त परि.२. पुणे श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे. श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता देवकाते, श्री. राहुल कुमार खिलारे, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, चेतन गोरे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, यांच्या पथकाने केली


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!