गुन्हे शाखा युनिट 3 ची चांगली कामगिरी ! परप्रांतीय कमगारास लुटण्याचे उद्देशाने चाकूने भोकसणाऱ्या व मोटरसायकल चोरी करणाऱ्या बाल गुन्हेगारास घेतले ताब्यात.


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट ३ पिंपरी चिंचवड शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दि.12/12/02024 रोजी रात्रौ 07.10 वा. सु. म्हाळुंगे स्मशानभुमी तळयाजवळ एका इसमास एका अनोळखी इसमाने मोबाईल स्नॅचिंग करीत असताना प्रतिकार केल्याने चाकुने पोटावर, पाठीवर, मांडीवार चाकुने वार करुन गंभीर जखमी करुन पळुन गेला होता सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना पोहवा.479 सानप पो. शि .1281 कोळेकर पो. शि.2877 मेरगळ  यांना मिळालेल्या गोपनिय बातमीवरुन विधीसंघर्षीत बालक यास ताब्यात घेवून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. तसेच सदर आरोपीकडुन *1) म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन 2) दिघी पोलीस* *स्टेशन असे* 02 मोटर सायकलचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदर विधीसंघर्षीत बालकावर यापुर्वी खुनाचा प्रयत्न 01, आर्म अॅक्ट 4,25 प्रमाणे 02 गुन्हे ,मोटर सायकल चोरी 05 गुन्हे दाखल आहेत.

सदर कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम , पोलीस हवालदार विठ्ठल सानप , ऋषिकेश भोसूरे, संदीप सोनवणे,पोलिस अंमलदार योगेश्वर कोळेकर, रामदास मेरगळ, राजकुमार हनुमंते, मनोज साबळे, राहुल सूर्यवंशी, यांनी केले आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!