सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करणा-या दोन महीला आरोपीना फरासखाना पोलीस स्टेशनकडून अटक
पंकेश जाधव संपादक 7020794626
फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- महीला नामे श्रीमती जहुरा अन्चर शेख, वय ४० वर्षे, धंदा वेश्याव्यवसाय, रा. ३१४, डांबर गल्ली, गुड्डुची बिल्डोंग, बुधवार पेठ, पेठ, प पुणे यांचा मुलगा नामे क इस्माईल अन्चर शेख, वय ६ वर्षे, हा दिनांक ०४/०४/२०२४ रोजी ११/०० वा चे सुमारास रहाते घरातून खेळण्यास जातो. असे सांगुन निघुन गेला तो सायंकाळी ६/०० वाजे पर्यंत घरी आला नाही. त्यामुळे त्यांनी त्याच मुलाचा आजुबाजुचं परिसरात शोध घेतला असता तो मिळून न आल्याने सदर मुलास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फुस लावून पळवुन नेले आहे. याची खात्री झालेने मुलाची आई श्रीमती जहुरा अन्चर शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन फरासखाना पोलीस ठाणे, पुणे गुन्हा रजि नंबर ८०/२०२४. भा. दं.वि कलम ३६३ प्रमाणे दिनांक ०४/०४/२०२४ ररोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
दाखल गुन्हयातील अपहृत मुलगा नाम कु इस्माईल अन्चर शेख, वय ६ वर्ष, याचेसह आरोपीचा शोध घेत असताना घटनास्थळाचे परिसरातील तपास पथकातील पोलीस अंमलदार वैभव. स्वामी, प्रविण पासलकर, सुमित खुटटे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर यांनी सी सी टी व्ही फुटेज तपासले असता यातील अपहृत मुलगा यास दोन अनोळखी महीला संशयीत रित्या रिक्षातुन घेवुन जात असलेबाबत दिसुन आले. त्यानंतर त्यांनी सदर रिक्षाचा सी सी टी व्ही फुटेजचे आधारे नंबर तपासुन निष्पन्न करुन रिक्षा चालकाकडुन माहीती घेतली व रिक्षात मुलाला घेवून जाणा या अनोळखी महीलांची ओळख पटविली असता सदरच्या महीला या फिर्यादी यांचे राहते परिसरात रहाण्यास असले बाबत माहीती मिळाल्याने सदर दोन अनोळखी महीलेपैकी एक महीला नामे नाझमा बिलाल शेख, वय ४३ वर्ष, रा २९५ बुधवार पेठ, उमडेरे बोळ, पुणे ही उमडेरे बोळ बुधवार पेठ, पुणे हीस ताब्यात घेवुन तिचेकडे तपास करता तिने गुन्हयाची स्पष्ट कबुली दिलेने तिला दाखल गुन्हयाचे कामी दि. ०५/०४/२०२४ रोजी १८/०० वाजता अटक अटक करण्यात आली आहे. सदर महीला आरोपीने यातील अपहृत मुलगा हा महीला नाम रेणु दिलीप राठोड, वय ४१ वर्ष, रा २९५ बुधवार पेठ, उमडेरे बोळ, पुणे हीचेकडे असलेबाबत सांगीतले. यातील महीला नामे रेणु राठोड हीचा शोध घेत असताना दिनांक ०६/०४/२०२४ रोजी सकाळी सदर महीला ही यातील अपहृत मुलास घेवुन स्वारगेट एस टी स्टॅन्ड, परिसरात संशयीत रित्या फिरत असल्याचे समजले. सदर वातमीच्या अनुषांगाने लागलीच वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशन कडील पोलीस उप निरीक्षक, श्री जयसिंग दाळे, व स्टाफ असे स्वारगेट एस टी स्टॅन्ड, पुणे येथे तपासाकरीता रवाना झाले. सदर पथकाने यातील महीला आरोपी नामे रेणु दिलीप राठोड, वय ४१ वर्ष, रा २९५ बुधवार पेठ, उमडेरे बोळ. पुणे हीस यातील अपहृत मुलासह स्वारगेट एस टी स्टॅन्ड पुणे येथुन ताब्यात घेवुन सवर महीला आरोपी हीथेकडे गुन्हयाबाबत तपास केला असता तिने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असुन तिला वाखल गुन्हयात दिनांक ०६/०४/२०२४ रोजी १२/३० वाजता अटक करण्यात आली आहे. सवर महीला आरोपीने यातील अपहृत मुलास तिची साथीदार नामे नाझमा बिलाल शेख, वय ४३ वर्ष रा २९५ बुधवार पेठ, उमडेरे बोळ, पुणे ही उमढेरे बाळ बुधवार पट, पुणे हीच मदतीने घेवुन गेल्याचे सांगीतले. यातील महीला आरोपी यांचेकडे तपास करता त्यांनी यातील फिर्यादी जहुरा अन्वर अन्वर शेख यम ४० वर्षे, होने काही दिवसापुर्वी महीला आरोपी यांचेशी भांडण केले होते त्याचा राग मनात धरून जहुरा शेख हीस त्रास देण्याचे हेतुने तीचा लहान मुलगा नामे कु इस्माईल अन्वर शेख, वय ६ वर्षे यास फुस लावुन घेवून गेल्याचे कबुल केले आहे.
अशाप्रकारे दाखल गुन्हयातील अपहृत करण्यात आलेल्या सहा वर्षाच्या मुलाला दोन महीला आरोपी यांचेकडुन ताब्यात घेण्यात आले आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास श्री जयसिंग बाळे, पोलीस उपे निरीक्षक, फरासखाना पोलीस स्टेशन हे करत आहेत
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. प्रविण पवार, मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पूर्ण श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे, सिंह गिल्ल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग पुणे श्री संदीप श्रीमती रुक्मीणी गलंडे, यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री प्रशांत भस्मे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वैभव गायकवाड पोलीस उप निरीक्षक जयसिंग दाळे, पोलीस उप निरीक्षक, निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मेहबुब मोकाशी, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, अविनाश गोपनर, गोविद गुरव, प्रमोद मोहीते. सुमित खुई, संदीप कावळे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, अर्जुन कुडाळकर, महीला पोलीस अमलदार आशा कांबळे, जयश्री पवार, पुनम ओव्हाळ, अनिता महाडीक, मिनाज शेख, उज्वला बनसोडे, यांच्या पथकाने केली आहे।

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

