सिंहगड रोड पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी ! रेकॉर्ड वरील गुन्हेगाराकडुन दोन पिस्टल व चार जिवंत काडतुस केले जप्त


इरफान शेख पुणे प्रतिनिधी 8888429429

सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दि.१७/१०/२०२४ रोजी पोलीस अंमलदार स्वप्निल मगर व पोलीस अंमलदार विनायक मोहीते यांना आमचे खास बातमीदारामर्फत बातमी मिळाली की, धायरी, नन्हे भागात एक इसम अवैध रित्या गावठी पिस्टल जवळ बाळगुन सदर भागात फिरत आहेत. अशी खात्रीशिर बातमी मिळाली असता सदरची बातमी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि सचिन निकम यांना कळविली असता त्यांनी सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन बातमीची खात्री करुन पुढील योग्य ती कादेशिर कार्यवाही करा असा तोंडी आदेश दिल्याने सदर कार्यवाही करणे सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक भांडवलकर, पोलीस हवालदार/२४६ तारू, पोलीस शिपाई ८६०० चव्हाण, पोलीस शिपाई ०३ मोहिते, पोलीस शिपाई १०५१० शेडगे, पोलीस शिपाई ८३४३ पाटील, पोशि १०२१५ मगर, दोन पंच असे खाजगी वाहनामधुन पंचनामा करण्यासाठी लागणारे सर्व साधन सामुग्रीसह लॅपटॉप प्रिंटरसह रवाना झालो होतो.

 सिंहगड रोड पोलीस स्टेशन तपास पथक पोलिस स्टेशन हद्दीत फिरत फिरत वडगाव पुलाखाली पुणे येथे १५/०० वा चे सुमारास आलो असता स्वप्निल मगर, विनायक मोहीते व शिवाजी क्षीरसागर यांना त्याचे खास बातमी दारामार्फत पुन्हा बातमी मिळाली की, दोन ते तिन इसम त्यामधील एकाने अंगात काळ्या रंगाचा शर्ट व जिन्स पॅन्ट घातली आहे, त्यांच्याकडे गावठी पिस्टल असुन ते नवीन कॅनोल रोड आनंदवन हेरीटेज बिल्डींग जवळ हिंगणे खुर्द पुणे येथे उभे आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी मा. वरीष्ट पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस ठाणे, पुणे शहर यांना कळविली असता मा. वरिष्ठांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन पुढील योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने त्यांचे मार्गदर्शनानुसार लागलीच सपोनि निकम, पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस स्टाप, दोन पंच असे खाजगी गाडीने वडगाव ब्रिज येथुन निघुन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी आली कडे थांबुन बातमी प्रमाणे खात्री करता बातमीतील वर्णना प्रमाणे तीन इसम हे रोडच्याकडेला एकमेकांसोबत बाचाबाची करत असल्याचे दिसुन आले सदर इसमांची व आमची नजरा नजर होताच ते सदर ठिकाणाहुन पळुन जात असताना वरील स्टाफचे मदतीने १६/१० वा. चे सुमारास पकडुन त्यांना त्यांचे नावे व पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नावे व पत्ता (१) राज रविंद्र जागडे वय-२२ वर्षे रा. आझाद मित्र मंडळाजवळ चरवडवस्ती वडगाव बुद्रुक पुणे व दोन विधीसंघर्षीत बालक मिळुन आले त्यांची अंगझडती घेता आरोपी नामे राज राजेंद्र जागडे याचे जवळ ४०,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळुन आले तसेच दोन विधीसंघर्षीत बालक यांच्या ताब्यात ४०,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतुस जवळ मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन नमुद गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा.श्री रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर मा. संभाजी कदम सोो, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ – ३, पुणे शहर श्री. अजय परमार सोो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर श्री. राघवेद्रसिंह क्षीरसागर साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. उत्तम भजनावळे सोो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री. सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, पंकज देशमुख, अमोल पाटील, विनायक मोहीते, स्वप्निल मगर, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडुळे, विकास बांदल, यांचे पथकाने केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!