येरवडा मध्यवर्ती कारागृहमधे श्री. एम ए सय्यद, सदस्य, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली…
पंकेश जाधव संपादक 7020794626
येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे-०६.
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. श्री. एम ए सय्यद, सदस्य, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई व मा. श्री. एन के पाटील, सचिव, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांनी दि.१६.०८.२०२४ रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे भेट देवून तपासणी केली.
सदर भेटीमध्ये मा. महोदयांनी कारागृहातील गांधी यार्ड, बंदी बरॅक, कारखाना विभाग, दवाखाना विभाग, अतिसुरक्षा विभाग, व्ही. सी. कोर्ट, ई-मुलाखत इत्यादी टिकाणी येथे प्रत्यक्ष भेट देऊन बंद्यांना देण्यात येणा-या कारागृहीन सोई-सुविधा आहार, उपहारगृह, दुरध्वनी सुविधा, व्हीडिओ कॉन्फरन्सींग, बंदी मुलाखत, ई-मुलाखत वैद्यकीय सुविधा, बंदी अडी-अडचणी संदर्भात याबाबत आढावा घेतला. तसेच कारागृहातील सुरक्षा व्यवस्था, महिला बंद्यांना देण्यात येणा-या सुविधा, Over Crowding, नवीन बांधकामे, बंदी आरोग्य व कारागृहाच्या दैनंदीन अडी-अडचणी याबाबत माहिती जाणुन घेतली.
Advertisement
सदर भेटीदरम्यान श्री. सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे श्रीमती. पी पी कदम, अति. अधीक्षक, श्री. आर. ई गायकवाड, उपअधीक्षक, श्री. एम. एच. जगताप, उपअधीक्षक, श्री. आनंदा एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्री. सी आर सांगळे, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२ उपस्थितीत होते.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

