येरवडा महिला कारागृहामध्ये महिला बंद्यांसाठी विविध सेवाभावी संस्थेमार्फत धार्मिक, सामाजिक, मनोरंनात्मक, समुपदेशपर असे प्रशंसनिय उपक्रम
पंकेश जाधव संपादक 7020794626
येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे-०६.
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- येरवडा महिला कारागृहामध्ये महिला बंद्यांसाठी विविध सेवाभावी संस्थेमार्फत धार्मिक, सामाजिक, मनोरंनात्मक, समुपदेशपर असे प्रशंसनिय उपक्रम राबविण्यात येतात. त्यानूसार आज दि.१७.०८.२०२४ रोजी महिला माहेर प्रतिष्ठान, पुणे या संस्थेमार्फत येरवडा महिला कारागृहातील महिला बंद्यांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमात विविध देशभक्तीपर हिंदी, मराठी गाणी प्रसिध्द् गायिका श्रीमती सावणी रविंद्र यांनी सादर केली. सदर कार्यक्रमास महिला बंद्यांनी उस्त्फुर्त प्रतिसाद दिला व महिला बद्यांच्या ०६ वर्षाखालील लहान मुलांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. तसेच सदर संस्थेकडुन निशुल्क प्राप्त फायबर थाळी, वाटी व ग्लास यांचे वाटप महिला बंद्यांसाठी करण्यात आले.
सदर कार्यक्रम मा. प्रशांत बुरडे (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतुन व मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी श्री. सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवती कारागृह, पुणे श्रीमती. पी पी कदम, अति. अधीक्षक, श्री. आनंदा एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्रीमती. आर ए खिलारी, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२, श्रीमती. तेजश्री पोवार, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२ व महिला अधिकारी / कर्मचारी यांनी
कामकाज पाहीले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

