अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास एक देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसासह वाकड पोलीस ठाणेचे तपास पथकाकडून शिताफीने अटक
पंकेश जाधव संपादक 7020794626
वाकड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत बेकायदेशीर अग्नीशस्त्रे व दारुगोळा बाळगणारे, खरेदी विक्री करणारे त्याद्वारे समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत मा.श्री. विनयकुमार चौबे सारे, पोलीस आयुक्त, मा. डॉ. शशीकांत महावरकर, पोलीस सह आयुक्त, श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी आदेशीत केलेले आहे. त्यानुसार परिमंडळ २ चे पोलीस उप आयुक्त, श्री. विशाल गायकवाड, वाकड विभाग, सहायक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांनी अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या खरेदी विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करिता विशेष मोहिम सुरु केली आहे.
श्री. निवृत्ती कोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी वाकड पोलीस ठाण्यातील अधिकारी/अंमलदार यांना वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणा-यांवर कायदेशीर कारवाई करणेबाबत सांगितले आहे. त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदा दिनांक २९/०१/२०२५ वाकड पोलीस ठाण्याचे ह्दीत पेट्रोलींग करीत असताना त्यांना बातमीदराकडून ताथवडे सर्व्हिस रोड येथे मयुर लॉजचे जवळ, ताथवडे, पुणे येथे येथे एक इसम त्याचे जवळ बेकायदेशीर पिस्तुल बाळगून आहे अशी बातमी मिळाली होती. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांचेसह बातमीदाराने दिलेल्या बातमीनुसार ताथवडे सर्व्हिस रोड येथे मयुर लॉजचे जवळ, ताथवडे, परिसरात सापळा लावून इसम नामे समिर नवाब शेख, वय २७ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, गव्हाणे हॉस्पीटल शेजारी, थेरगाव, पुणे यास शिताफिने ताब्यात घेतले. त्याचेकडे बेकायदेशीर देशी बनावटीचे “एक पिस्टल, एक जिवंत काडतुस” ५२,०००/- रुपये किंमतीचे मिळून आले. सदर घटनेबाबत वाकड पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ४६/२०२४ भारताचा शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून नमूद गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली असून अधिक तपास चालू आहे.
नमूद आरोपी समिर नवाब शेख याचेविरुध्द वाकड पोलीस ठाणे येथे १) गु.र.नं. ३९३/२०१८, भादंवि कलम ४२७,४५२,५०४,५०६(२),१४३,१४४,१४७,१४९,१४९ २) गु.र.नं. १०२८/२०१८, भादंवि कलम ३२७,३३६,५०६ (२), ३४ ३) गु.र.नं. १४४/२०१८, भादंवि कलम ४३७, ४३६,४२७,१४३,१४४ ४) गु.र.नं. ४२८/२०२०, भादंवि कलम १८८ आर्म अॅक्ट ४,२७ मपोका कलम १४२, ३७ (१) (३) सह १३७ कि.लॉ.अ.अॅ. ३, ७ ५) गु.र.नं. २१०/२०२०, मपोका कलम १४२ ६) गु.र.नं. ६१४/२०२०, मपोका कलम १४२ ७) गु.र.नं. १००/२०२४, मपोका कलम १४२ ८) गु.र.नं. १७/२०२२, भादंवि कलम ३९७, ३२३ मपोका कलम ३७ (१) (३), सह १३५ आर्म अॅक्ट कलम ४, २५ मोका व गु.र.नं. १८/२०२२ आर्म अॅक्ट ४,२५ मपोका कलम ३७ (१) (३) सह १३५ क्रि.लॉ.अ.अॅ. ३, ७ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. श्री. विनय कुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.डॉ. शशीकांत महावरकर, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, श्री. विशाल गायकवाड सो, पोलीस उप आयुक्त, परि-२, श्री. सुनिल कुराडे, सहा. पोलीस आयुक्त सारे, वाकड विभाग यांचे मार्गदर्शनाखली वाकड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निवृत्ती कोल्हटकर, सपोनि., सुभाष चव्हाण, पोउपनि. अनिरुध्द सावर्डे, श्रेणी पोउपनि विभीषण कन्हेरकर, पोलीस अंमलदार संदिप गवारी, वंदु गिरे, ज्ञानदेव झेंडे, कौर्तेय खराडे, सौदागर लामतुरे, तात्यासाहेब शिंदे, नामदेव वडेकर, विजय भुसारे, सचिन गायकवाड, रामचंद्र तळपे, विजय घाडगे, दिपक साबळे यांनी केलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. अनिरुध्द सावर्डे हे करीत आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

