विश्रांतवाडी ड्रग्स प्रकरणातील पाहिजे आरोपी यास गुजरात येथुन अटक गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी
पंकेश जाधव संपादक 7020794626
अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु.र.न २६३/२०२४ एन.डी.पी.एस अॅक्ट ८ (क) २२ (क) २९ गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक उल्हास कदम अंमली पदार्थ विरोधी पथक १ हे करित आहेत. गुन्हयातील अटक आरोपी नामे निमीश सुभाष अबनावे याच्याकडे सदर गुन्हयातील इतर सहभागी आरोपींबद्दल चौकशी व तपास केला असता इसम नामे मोहम्मंद अस्लम मोहम्मंद ईस्माईल मर्चेंट हा निषन्न झाला सदर आरोपी याची गोपनिय माहिती घेवुन पोउनि दिगंबर कोकाटे अंमली पदार्थ विरोधी पथक १ व टिम यांनी ता. जंबुसर जि. भरुच राज्य गुजरात येथुन सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेण्यात आले आहे. अटक आरोपीकडे एम डी ड्रग्स बाबत अधिक तपास सुरु आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे १ श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सपोनि नितीन नाईक, पोलीस उप निरीक्षक दिंगबर कोकाटे, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, नितेश जाधव, दया तेलंगे पाटील, अविनाश कोंडे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

