कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी!दारूच्या नशेत नेहमीच शिवीगाळ करणाऱ्या मित्राचा खुन करणाऱ्या आरोपीस 8 तासात केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

कोंढवा पोलिस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :-आज दि.०९/०१/२०२४ रोजी कोढवा पोलीस ठाणेच्या हद्दीत कामठे पाटील नगर येथील हातीमी हिल्स सोसायटीच्या मागील निर्जळ स्थळी एका इसमाच्या तोडावर मारहाण करुन, गळा आवळुन खून करुन बॉडी फेकून देण्यात आली होती.

खुन करणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध घेवुन ताब्यात घेण्याबाबतच्या सुचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिल्या होते. अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकामी कोंढवा पोलीस ठाणेकडील दोन तपासपथके तत्काळ रवाना करण्यात आली होती.

सहा पोलीस निरीक्षक लेखाजी शिदे व सहा पोलीस निरीक्षक दिनेश पाटील हे तपास पथकातील अमलदार यांच्यासह अज्ञात आरोपी यांचा शोध घेत होते.

प्रथम मयत बाँडी ही नसीम सइदुल्लाह खान, वय ३७ वर्षे, रा. लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे  मुळ रा. कुशीनगर उत्तरप्रदेश यांची असल्याची माहिती निष्पन्न केली गेली. तेव्हा सदर इसमाचा कोणाशी वाद आहे का? कोणाशी भाडणे झाली आहे का? याबाबत तपास केला असता काही एक उपयुक्त माहिती मिळाली नाही, त्याचप्रमाणे घटनास्थळी कोणत्याही प्रकारचे सीसीटिव्हि फुटेज, प्रत्याक्षदर्शी साक्षीदार अगर तांत्रिक पुरावा तसेच परिस्थितीजन्य पुरावा प्रथमदर्शनी मिळुन न आल्याने

Advertisement

पोलीसासाठी आरोपीबाबत माहिती मिळवीने आव्हानात्मक झाले. अश्या प्रतिकुल परिस्थितीत सदर घटनास्थळा जवळील वस्तीमध्ये राहणारे इसमानी त्याचा घात केला असल्याबाबत संशय बळविल्याने गोपनीय माहिती काढुन कमल रोहित ध्रुव, वय १९ वर्षे, रा.लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे  मुळ रा. छत्तीसगड यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे तपास केला असता त्याने पहिल्यादा उडवाउडवीची उत्तरे दिली, परतु त्यास पोलीस खाक्या दाखवुन वेळप्रसंगी भावनिक प्रश्न विचारुन चौकशी केली असता त्याने मयत नसीम सइदुल्लाह खान हा त्यास दारु पिवुन रोजच शिवीगाळ करित होता. तसेच घटनेच्या दिवशी देखील मयताने त्यास पुन्हा शिवीगाळ करुन बाहेर निघुन गेला होता. तेव्हा कमल रोहित ध्रुव याने त्याच्या पाठोपाठ हातीमी हिल्स सोसायटीच्या मागील निर्जळ स्थळी जावुन प्रथम हाताने गळा आवळून व नंतर तोडावर दगड मारुन जखमी करुन खुन केल्याची कबुली दिली आहे.आरोपी व मयत टाइल्स फिटिंगचे काम करायचे

सदरची कामगिरी मा. रितेशकु‌मार सो पोलीस आयुक्त, मा.रंजन शर्मा सो, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. आर राजा, पोलीस उप आयुक्त सो परि.०५, मा. शाहुराव साळवे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, सतीष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संदिप भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) याच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, पो हवा. अमोल हिरवे, पो हवा विशाल मेमाणे, पो हवा लवेश शिंदे, पो हवा निलेश देसाई, पो हवा सतीश चव्हाण पो शि शाहिद शेख, पो शि संतोष बनसडे. पो.शि. जयदेव भोसले. पो.शि. विकास मरगळे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!