पुणे पोलिसांची उलेखनिय कामगिरी ! सराईत गुन्हेगारांकडून 42 पिस्तूल सह 74 जिवंत काडतुसे केली जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. २४ :- पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे शहरातील १४ पोलिस स्टेशनच्या हद्दीत संयुक्त कारवाई करून बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे. यात एकूण ४२ पिस्तूल व ७४ जिवंत काडतुसे असा एकूण १२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन २८ आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखेचे युनिट तीनच्या पथकाने २१ मार्च रोजी केलेल्या कारवाईत प्रशांत मगम पवार (वय २८ रा. सिंहगड रोड पुणे) यांच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे एक किया कंपनीची कार जप्त करण्यात आली आहे. तर मेघराज उर्फ पप्पु लक्ष्मण दराडे (वय ३२ रा. अहमदनगर) यांच्या कडून चार पिस्तूल व १० काडतुसे तर समीर हरीभाऊ हरपुडे (वय ३२ रा. कोथरूड पुणे) यांच्या कडून एक पिस्तूल असा एकूण १९ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण २८ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Advertisement

दरम्यान यात दिनांक १४ एप्रिल रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये तडीपार गुन्हेगार निखिल राजू शिरसाठ (वय २१ रा. धायरी पुणे) याला अटक करून सहा पिस्तूल १० काडतुसे मोपेड कोयता असा एकूण २ लाख ८० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर दिनांक १५ एप्रिल रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत तडीपार गुंड अश्विन बाळकृष्ण लोणारे (वय २० रा.धायरी पुणे) याला अटक करून तीन पिस्तूल व ६ काडतुसे जप्त करण्यात आली आहे. तसेच वैभव अनंता तरडे (वय २३ रा.धायरी पुणे) याच्याकडून ३ पिस्तूल व ६ काडतुसे असा एकूण २ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच २२ मार्च रोजी खंडणी विरोधी पथक एकने सुरज रोहिदास खंडागळे (वय ३० रा. वारजे पुणे) याला अटक करून एक पिस्तूल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहे


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!